बस चालक -वाहकांच्या मनमानी चा फटका प्रवाशांना विभाग नियंत्रक लक्ष देतील काय?

कोंढाळी-वार्ताहर
नागपूर व अमरावती (प्रदेशातील)मध्यवर्ती बस स्थानकावरून सोडण्यात येणार्या एस टी बस गड्याचा कोंढाळी थांबा घेण्याच्या सूचना देणे बाबद…..
साहेब…
आपणास माहित देत आहोत की-
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अनेक बसेस चे चालक वाहकांच्या मनमानी चा फटका एस टी चे प्रवाशांना बसत आहे.
माहिती अशी की नागपूर वरून अमरावती कडे जाणाऱ्या बर्याच शिवशाही बसेस त्याच प्रमाणे अनेक साध्या बसगाड्या सेवा ही कोंढाळी बस स्थानकापासून 350मीटर लांब उडानपुलाचे सुरवातीला च उतरवून पुढे निघून जातात. यात प्रवासा दरम्यान लहान मुलांना तसेच सोबत लगेज घेऊन राष्ट्रीय महामार्ग ओलांडून जीव धोक्यात घालून कोंढाळी बस स्थानकावर किंवा गावात जावे लागते. असाच प्रकार अमरावती वरून नागपूर कडे येणार्या अनेक बस गड्या बस्थानकावर न येता वर्धा टी पाईंट वर थांबतात,
साहेब असल्या घटणा नियमावली नुसार बरोबर नाही. साहेब कृपया या बाबतीत नागपूर मध्यवर्ती बस स्थानक व अमरावती मध्यवर्ती बस स्थानका वरून (जुने दोन्ही प्रादेशिक विभाग ) सोडण्यात येणार्या सर्व प्रवासी बस सेवा कोंढाळी बस स्थानकावर प्रवासी चढ -उतार करून पुढे जाव्यात अशी कोंढाळी सह लगतच्या ४२गावकर्यांची मागणी आहे. तरी या प्रकरणी योग्य ती दखल घेण्या करीता नागपूर व अमरावती विभाग नियंत्रक व एस टी चे वरिष्ठ अधिकारी यांना निर्देश दिले तर प्रवाश्यांना सोईचे होईलअशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा सचीव नितीन ठवळे, चिखली सरपंच राजू चोपडे,राहूल डोंगरे, राजू किनेकर,रूपेश बुरडकर, यांनी केली आहे.