BREAKING NEWS:
नई दिल्ली हेडलाइन

‘बदलती शिक्षण पद्धती’ या विषयावर उद्या प्रसिद्ध लेखिका डॉ. छाया महाजन यांचे व्याख्यान 

Summary

नवी दिल्ली, दि. २ : महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत प्रसिद्ध लेखिका‍ डॉ. छाया महाजन या उद्या ३ ऑगस्ट २०२१ रोजी ‘बदलती शिक्षण पद्धती’ या विषयावर ४७ वे पुष्प गुंफणार आहेत.   महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० […]

नवी दिल्ली, दि. २ : महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत प्रसिद्ध लेखिका‍ डॉ. छाया महाजन या उद्या ३ ऑगस्ट २०२१ रोजी ‘बदलती शिक्षण पद्धती’ या विषयावर ४७ वे पुष्प गुंफणार आहेत.

 

महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु आहे. ३ ऑगस्ट रोजी डॉ. छाया महाजन या दुपारी ४ वाजता या व्याख्यानमालेत विचार मांडणार आहेत.

 

डॉ. छाया महाजन यांच्याविषयी…  

      डॉ. छाया महाजन या शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात कार्यरत आहेत. औरंगाबाद येथील डॉ. इं.भा.पा. महिला महाविदद्यालच्या प्राचार्य म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.

 

डॉ. छाया महाजन यांची ३८ पुस्तके प्रकाशित असून यात ५ कादंबऱ्या, २ हिंदी अनुवादीत कादंबऱ्या व २ इंग्रजी पुस्त्कांचा समावेश आहे. तसेच ७ कथासंग्रह, ५ ललित गद्यसंग्रह, ४ बाल वाड्मय, १ चरित्र लेखन आणि १२ भाषांतरांचा यात समावेश आहे. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार  प्राप्त झाले आहेत.  २०१५ मध्ये त्यांनी मराठवाडा लेखिका संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.

 

बनारस हिंदू विद्यापीठाच्या मेंबर ऑफ लॉर्डस् म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी विविध संस्थांमध्ये महत्त्वाच्या पदांवर कार्य केले आहे.

     

मंगळवारी समाज माध्यमांद्वारे व्याख्यान प्रसारण  

मंगळवार,  ३ ऑगस्ट ऑगस्ट 2021 रोजी  दुपारी  4  वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक  आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत  आहे.

हे व्याख्यान परिचय केंद्राचे  ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share   तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi  युटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *