बँक ऑफ महाराष्ट्र मधील बँक मॅनेजर च्या लापरवाही मुळे ६४०५ रू. अफरातफर धनराज दयाराम दमाहे यांनी कार्यवाही करण्यासाठी तहसीलदाराला दिले निवेदन
बँक ऑफ महाराष्ट्र गोरेगाव च्या बँक मॅनेजर च्या लापरवाही मुळे धनराज दयाराम दमाहे यांचा खात्यामधील ६४०५ रुपये अफरातर झाल्याची माहिती बापू वार्ता न्युज ला निवेदन पत्रात दिली.
गोरेगाव तालुक्यांतील कमरगाव येथिल रहिवाशी
धनराज दयाराम दमाहे यांनी सांगितले की माझ्या खात्यामध्ये ६४०५ रुपये शिल्लक राशी जमा होती . व तसेच माझा खाता बंद पण झाला अशी माहिती बँक मॅनेजर यांनी दिली, व खात्यावरील पैसे पण अफरातफर झाले अशी माहिती मिळाली.
या करिता धनराज दयाराम दमाहे हा बँक मध्ये विचारपूस करण्यासाठी गेले असता त्यांना दुसरा खाता खोला व जे झाले त्याला विसरून जा असे म्हणाले व बँक ऑफ महाराष्ट्र च्या बँक मॅनेजर वर उचीत कार्यवाही करुन न्याय देण्यात यावा व तसेच माझ्या बँक खात्यात धान खरेदी विक्री चे पैसे जमा होणार होते तसेच बोनस पण जमा होणार व प्रधान मंत्री आवास योजनेची किस्त व किसान निधीचे पैसे जमा होणार होते ते कुठे जमा होणार असे धनराज दयाराम दमाहे यांनी सांगितले.
बँक ऑफ महाराष्ट्र च्या बँक मॅनेजर वर कार्यवाही करुन मला न्याय नाहि मिळाला तर व त्यांना तात्काळपणे कार्यवाही करुन निलंबित करण्यात आला नाहि तर अन्यथा मी आमरण उपोषण करणार जो पर्यंत न्याय मिळणार नाही तो पर्यंत अशी माहिती धनराज दयाराम दमाहे यांनी दिली.