महाराष्ट्र हेडलाइन

फुले वार्डात पाण्याचा भीषण दुष्काळ? नगरसेवक कुंभकर्ण झोपेत?

Summary

गडचिरोली :- विभागीय प्रतिनिधी , चक्रधर मेश्राम दि.23 मे. 2021:- गडचरोली शहरातील फुले वार्डात पाण्याचा भीषण दुष्काड पडलेला असून पिण्याच्या पाण्यासाठी वार्डातील बाया बापड्यांना दारोदार भटकावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रसंगी दुसऱ्याचे कठोर बोल मुकाट्याने ऐकावे लागत असल्याने अपमानास्पद […]

गडचिरोली :- विभागीय प्रतिनिधी , चक्रधर मेश्राम दि.23 मे. 2021:-
गडचरोली शहरातील फुले वार्डात पाण्याचा भीषण दुष्काड पडलेला असून पिण्याच्या पाण्यासाठी वार्डातील बाया बापड्यांना दारोदार भटकावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रसंगी दुसऱ्याचे कठोर बोल मुकाट्याने ऐकावे लागत असल्याने अपमानास्पद वाटत आहे. वार्डात काही राजकीय हित सबंध जोपासणारे व नगरसेवकांची चाटु गिरी करणाऱ्या लोकांनी आपल्या घरातील नळाला टिल्लूपंप लावून अवैधरित्या पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात करीत आहेत . ज्यांच्याकडे नळाचे काहीच कनेक्शन किंवा मशीन नाही त्यांना पाण्यासाठी मरणयातना भोगावे लागत आहेत.टिल्लूपंप धारकाच्या नावाने कुणी आरडा ओरड केल्यास त्यांचेवर दबाब टाकून त्यांचे तोड दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु ही गंभीर बाब नगरसेवकाच्या नजरेत येत असताना सुद्धा त्यांनी झोपेचे सोंग घेऊन टिल्लूपंप धारकांना अवैधरित्या प्रोसाहित करीत आहेत. तसेच नगरसेवक हे सुद्धा टिल्लूपंप चा वापर करून पाण्याचा अवैधरित्या उपसा मोठ्या प्रमाणात करीत आहेत. तसेच वार्डातील एका प्रतिष्टीत वक्तीने आपलाच घरात पाण्याची इंडस्ट्रीज खोलून पाणी विकत असल्याचे सांगितले जात आहे तरी नगरपरिषदेने एकतर टिल्लूपंप धारकावर धाड टाकावी किंवा वार्डात पाणी विपुल प्रमाणात सोडून लोकांनां पुरवावे अशी मागणी वाडाऀतील नागरिकांनी केली आहे. अशी माहिती अनुप मेश्राम यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *