क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

प्रेम विरहात तरुणीने केली आत्महत्या. दोन दिवसांनी मिळाला विहिरीत मृतदेह

Summary

लाखांदूर प्रतिनिधी          लाखांदूर तालुक्यातील तई / बु. येथील गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका २० वर्षीय मुलिचे मृतदेह गावातील एका राम मंदिराच्या विहिरीजवळ सापडले. मृत तरुणीचे नाव प्रांजली शास्त्री कोल्हे रा. तई /बु. येथिल रहिवासी आहे. […]

लाखांदूर प्रतिनिधी
         लाखांदूर तालुक्यातील तई / बु. येथील गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका २० वर्षीय मुलिचे मृतदेह गावातील एका राम मंदिराच्या विहिरीजवळ सापडले. मृत तरुणीचे नाव प्रांजली शास्त्री कोल्हे रा. तई /बु. येथिल रहिवासी आहे.

प्रेम विरहात तरुणीने आत्महत्या केल्याचे उघडकीस झाले आहे.

मृतक प्रांजली कोल्हे ही १२ जानेवारी रोजी आपल्या आई सोबत झोपली होती. मात्र रात्री दरम्यान झोपेतून निघुन गेली व घरच्या लोकांनी शोधाशोध केले असता मात्र मुलगी घरी नसल्याने पालांदुर पोलीस स्टेशन ला माहिती दिली तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक वीरसेन चहांदे व पोलीस ताफ्यासह घटनास्थळी हजर होऊन विहिरीत असलेला मृतदेह बाहेर काढून पंचनामा करून
शवविच्छेदना करीता पाठवण्यात आले.

अधिक माहिती विचारले असता गावातील एका तरुणावर तिचे प्रेम होते. प्रस्तुत प्रेम त्या तरुणाने मान्य केले होते. परंतु काही कालावधीनंतर मृतक तरुणीचा प्रियकर हा मरण पावल्याने,
मृतक प्रांजली शास्त्री कोल्हे ही आपल्या प्रियकराच्या प्रेम विरहात दुःखी जीवन व्यतीत करीत होती. त्यातच मृतक प्रांजली शास्त्री कोल्हे (२०) हिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. पुढिल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वीरसेन चहांदे पालांदुर हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *