प्रा. शेषराव येलेकर उत्कृष्ट क्षेत्रीय अध्यक्ष म्हणून सन्मानित
प्रा. शेषराव येलेकर उत्कृष्ट क्षेत्रीय अध्यक्ष म्हणून सन्मानित
गोंदिया येथे नुकताच लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 चा पुरस्कार वितरण सोहळा ” राज सन्मान ” माजी प्रांतपाल राजेंद्र सिंग बग्गा
यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रा. शेषराव येलेकर यांना *प्रांताचा उत्कृष्ट क्षेत्रीय अध्यक्ष* ( Best Zone Chairperson of the district) हा पुरस्कार डॉ. राजे मुधोजी भोसले, यशोधरा राजे भोसले व प्रांतपाल राजेंद्र सिंग बग्गा यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विद्यमान प्रांतपाल लॉ श्रवण कुमार, उपप्रांतपाल डॉ रिपल राणे, माजी प्रांतपाल विनोद जैन, तसेच इतर माजी प्रांतपाल , प्रांतीय अधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
2021-22 या सत्राचे प्रांतपाल राजेंद्र सिंग बग्गा यांनी प्रा. शेषराव येलेकर यांच्यावर क्षेत्रीय अध्यक्ष(Zone Chairperson) पदाची जबाबदारी सोपविली. त्यांच्या अंतर्गत लायन्स क्लब गडचिरोली, ब्रह्मपुरी, चंद्रपूर औद्योगिक नगरी, चंद्रपूर टायगर सिटी या चार क्लबची जबाबदारी देण्यात आली होती. लायन्स क्लब इंटरनॅशनल ने मागील सत्रात बाल्यावस्थेतील कर्करोग, भूक, दृष्टी, पर्यावरण, महिला सबलीकरण या पाच जागतिक समस्यावर कार्य करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रा. शेषराव येलेकर यांनी त्यांच्या अंतर्गत येणारे क्लब यांना सदरील पाच समस्यावर काम करण्यास प्रवृत्त केले. लायन्स क्लब गडचिरोली या पाचही समस्यावर सर्वात जास्त कार्य करून, रिजनमध्ये सर्वाधिक पुरस्काराचा मानकरी ठरला होता. कोणत्याही परिस्थितीत क्लब बंद होऊ नये ते सक्रिय राहावे यासाठी
येलेकर सतत प्रयत्नशील होते. प्रांत आणि क्षेत्र यांच्यामधील आंतरक्रिया अधिक सुदृढ करण्याचा प्रा येलेकर यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यामुळेच त्यांना उत्कृष्ट क्षेत्रीय अध्यक्ष पदाचा पुरस्कार प्राप्त झाला.
प्रा. शेषराव येलेकर हे ओबीसी नेते आहेत, ओबीसी समाजासाठी कार्य करीत असतानाच जिल्ह्यातील दुर्गम भागात लायन्स क्लबच्या माध्यमातून गरजूंसाठी आयोजित विविध उपक्रमात ते सहभागी होऊन कार्य करीत असतात. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.