प्राथमिक आरोग्य केंन्द्रात अँन्टी स्नेक वेनो इंजेक्शन उपलब्ध करण्याची मागणी, कन्हान शहर विकास मंच चे तहसिलदारांना निवेदन.

कन्हान : – तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंन्द्रात गेल्या खुप दिवसा पासुन अँन्टी स्नेक वेनो इंजेक्शन उपलब्ध नसल्याने तसेच नागरिकांना साप, विंचु सारखे सरपटणारे प्राणी चावल्याने कितीतरी लोकांचा मृत्यु झाल्याने कन्हान शहर विकास मंच पदाधिका-यां नी मंच उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर च्या नेतृत्वात तहसि लदार वरुणकुमार सहारे यांना भेटन निवेदन देऊन तात्काळ तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंन्द्रात अँन्टी स्नेक वेनो इंजेक्शन उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
पारशिवनी तालुक्यातील परिसरात मोठ्या प्रमाणात शेती होत असुन या तालुक्यात आरोग्य सेवा देणारे पाच प्राथमिक आरोग्य केंन्द्र असुन अँन्टी स्नेक वेनो इंजेक्शन चा अभाव असल्याने हे उपलब्ध करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असुन जमिनीत व शेतीमध्ये पाणी जमा होऊन जमिनीखाली व बिळात असणारे साप, विंचु सारखे मोठ मोठे सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणावर बाहेर निघत अचानक शेतकऱ्यांना चावा घेत असतात त्यामु ळे साप, विंचु चावलेल्या रूग्णांना वेळेवर योग्य उपचा र न मिळाल्याने लोकांचा मृत्यु होत असल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिका-यांनी मंच उपाध्यक्ष ऋृषभ बावनकरच्या नेतृत्वात तहसिलदार वरुणकुमार सहारे यांना भेटुन निवेदन देऊन तात्काळ तालुक्याती ल सर्व पाचही प्राथमिक आरोग्य केंन्द्रात अँन्टी स्नेक वेनो इंजेक्शन उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, कोषाध्यक्ष हरीओम प्रकाश नारायण, सदस्य शाहरुख खान, सुषमा मस्के, पौर्णिमा दुबे सह मंच पदाधिकारी उपस्थित होते.
तात्काळ उपलब्ध करू – तहसिलदार वरुणकुमार सहारे
कन्हान शहर विकास मंच चे पदाधिकारी मंच उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर यांच्या नेतृत्वात तहसिलदा र वरुणकुमार सहारे यांना दिलेल्या निवेदनाची दखल घेत तात्काळ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत वाघ साहेबांना फोन लावुन अँन्टी स्नेक वेनो इंजेक्शन बाबत विचारले असता त्यांनी उपलब्ध असल्याचे सांगितल्याने आणखी स्टाॅक वाढवुन तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंन्द्रात अँन्टी स्नेक वेनो इंजेक्शन वाटप करण्याचे निर्देश दिले आहे.
कन्हान शहर विकास मंच च्या निवेदनाची तहसिलदार वरुणकुमार सहारे यांनी तात्काळ दखल घेतल्याने मंच च्या पदाधिका-यांनी तहसिलदार वरुण कुमार सहारे यांचे आभार व्यक्त केले आहे.