महाराष्ट्र हेडलाइन

प्रशासनाचे प्रयत्नांना यश! जामगढ व तरोड येथील भटक्या जमाती चे नागरिक पोहोचले लसीकरण केंद्रावर 143नागरिकांनी घेतला लसीकरनाचा लाभ

Summary

कोंढाळी -दुर्गाप्रसाद पांडे वाढत्या कोरोना संक्रमणमुळे गावागावात संक्रमण रुग्ण असून घरीच विलगिकरन करून राहतात त्यातील काही रुग्ण विलविकारणात घरी असताना बाहेर फिरत सल्यामुळे संक्रमण वाढतीवर आहे. ही संक्रमनाची चैन तोडण्याकरिता प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर लसीकरण सुरू आहे. याला जनतेकडून चांगला प्रतिसाद […]

कोंढाळी -दुर्गाप्रसाद पांडे
वाढत्या कोरोना संक्रमणमुळे गावागावात संक्रमण रुग्ण असून घरीच विलगिकरन करून राहतात त्यातील काही रुग्ण विलविकारणात घरी असताना बाहेर फिरत सल्यामुळे संक्रमण वाढतीवर आहे. ही संक्रमनाची चैन तोडण्याकरिता प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर लसीकरण सुरू आहे. याला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असताना कोंढाळी परिसरातील तरोडा, जामगढ ,येथील भटक्या समाजातील नागरिकाचे गैर समजतीतून लसीकरण घेण्या करिता विरोध करीत होते. या बाबद ची माहीती याभागाचे आमदार व माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांना समजली, तेव्हा त्यांनी काटोल चे तहसीलदार, बी डीओ
तालुका आरोग्य अधिकारी व ठाणेदारांनी सह स्थानिय स्वराज्य संस्थाचे पदाधीकारी यांनी संबधीताची लसीकरण घेण्याचे समजूत घालावी अशी सुचना केली. यावर 11मे रोजी प्रशासन तरोडा व जामगढ येथे पोहचले गावात पोहचून या लोकांना कोरोना संक्रमण चैन तोडण्याकरिता लसीकरण महत्त्वाचे आहे या करिता येथील जनतेला लसीकरण करण्याचे आव्हान करण्यात आले
11 मे ला तरोडा -जामगढ़ येथे राहणाऱ्या भटक्या जमाती तील काही लोकांचा लसीकरणाला तीव्र विरोध दर्शवला होता , तेव्हा येथील भटक्या जमातीतील किस्मत चव्हाण, शंकर सोलंकी व त्यांचे युवक सहकारी काही जेष्ठ मंडळी ना प्रशासनिक आधिकारी तहसील अजय चरडे, ठाणेदार विश्वास पुलरवार, बी डी यो संजय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डाक्टर शशांक व्यव्हारे आरोग्य अधिकारी डाक्टर जयश्री वाळके यांनी संबधीताची समजूत घालून 12मे रोजी जामगढ़ येथे लसीकरण व कोविड तपाणी शीबीर लावले, अन् भटक्या जमातीतील 65वर्षीय रेखाबाई शालिकराम चव्हाण या महिलेने मुलगा किस्मत चव्हाण सोबत शीबीराव पोहोचलो व लसीकरन केले. या नंतर अनेकांनी कोविड चे लसीकरण करवून घेतले, तर अनेकांनी कोविड तपासी केली सर्वात आधी लसीकरन करवून घेतले, तर जामगढ़ येथे स्थानिक लसीकरणाला विरोध करीत असलेल्या स्त्री-पुरुषांना स्थानिक जनप्रतिनिधी सरपंच उषाताई धम्मरक्षित वाहने , माजी सभापती विजयसिंह रणनवरे, पं स सदस्य लता धारपुरे, ग्रा प सदस्य गुनवंतराव खवसे, किस्मत चव्हाण कैलास सुर्यवंशी, तथा ग्रा प सदस्य येथील भटक्या जमातीतील ग्रा प सदस्य तरुण किस्मत चव्हाण तसेच युवकांनी लसीकरण करण्याचे आव्हान केले, 12मे रोजी जामगढ़ येथे संपन्न लसीकरन केंद्रावर 88लोकांनी लसीकरण करवून घेतले. या प्रसंगी परिचारिका सुनंदा साठे, मानकर यांनी लसीकरन केले. नागपुर जि प चे उप मुख्याधिकारी राजेंद्र भुयार ही या प्रसंगी उपस्थित होते. तसेच
*तरोडा येथे 18मे रोजीलसीकरण*
18मे रोजी आरोग्य यंत्रणा तरोडा येथे पोहचली स्थानिय सरपंच
थामस निंभोरकर, शकिना भुरानी , तेजगीर चव्हाण , सिंधुबाई सोलंकी, सदस्य ग्राम पंचायत खैरी ,ग्राम सेवक लव्हाळे , सामाजिक कार्यकर्ता शंकर सोलंकी ,प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढाळी येथील डाक्टर जयश्री वाळके, यांनी स्थानिकांचा गैर समज दुर केल्यावर आरोग्य सेविका सरदार, व कोसे यांनी 55नागरिकांचे लसीकरण केले या प्रमाणे काटोल तालुका राजस्व, आरोग्य, पंचायत व पोलीस विभागाला स्थानिय नागरिकांचा गैर समज दुर करण्यात यश आले व एकूण 143नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *