BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

प्रशासकीय अधिकारी आणि पत्नींच्या संस्थेमार्फत शिलाई मशीन्सचे वितरण

Summary

मुंबई, दि. ९ – प्रशासकीय अधिकारी व त्यांच्या पत्नींची संघटना आयएएसओडब्ल्यूए (IASOWA) ही अखिल भारतीय स्तरावर कार्यरत असलेली ना नफा तत्वावर सामाजिक कार्यासाठी कटिबद्ध असलेली संस्था आहे. या संस्थेच्या महाराष्ट्र शाखेमार्फत शोभा अरुण नाईक आणि यास्मिन फिरोज मोमिन या स्वयंसाहाय्य गटातील दोन विधवा […]

मुंबई, दि. ९ – प्रशासकीय अधिकारी व त्यांच्या पत्नींची संघटना आयएएसओडब्ल्यूए (IASOWA) ही अखिल भारतीय स्तरावर कार्यरत असलेली ना नफा तत्वावर सामाजिक कार्यासाठी कटिबद्ध असलेली संस्था आहे. या संस्थेच्या महाराष्ट्र शाखेमार्फत शोभा अरुण नाईक आणि यास्मिन फिरोज मोमिन या स्वयंसाहाय्य गटातील दोन विधवा महिलांना शिलाई आणि कटर मशीनचे वितरण करण्यात आले. आयडीबीआयच्या सौजन्याने सीएसआरच्या माध्यमातून या मशीन्स देण्यात आल्या आहेत.

शुक्रवारी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात या मशीन्सचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती अर्चना मीना, सचिव श्रीमती आर.विमला, खजिनदार झेबा नाईक, सुप्रिया छडगल यांच्यासह संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्य तसेच आयडीबीआयचे पदाधिकारी उपस्थित होते.

०००००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *