नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

प्रधानमंत्री जिवनज्योती विमा योजने अंतर्गत दोन लाखाचा धनादेश मृतकाचे पत्नी ला सुपुर्द

Summary

कोंढाळी- प्रतिनीधी- दुर्गा प्रसाद पांडे कोंढाळी येथील स्टेट बैक आँफ इंडिया शाखेचे बचतखाता ग्राहक प्रकाश कुंभारे यांचे निधन झाले त्यांच्या पत्नी अनिता कुंभारे यांना स्टेट बैक आँफ कोंढाळी शाखेतर्फे तातडीने प्रधानमंत्री जिवन ज्योती योजना अंतर्गत दोन लाख रूपयांची मदत मिळवून […]

कोंढाळी- प्रतिनीधी- दुर्गा प्रसाद पांडे
कोंढाळी येथील स्टेट बैक आँफ इंडिया शाखेचे बचतखाता ग्राहक प्रकाश कुंभारे यांचे निधन झाले त्यांच्या पत्नी अनिता कुंभारे यांना स्टेट बैक आँफ कोंढाळी शाखेतर्फे तातडीने प्रधानमंत्री जिवन ज्योती योजना अंतर्गत दोन लाख रूपयांची मदत मिळवून देण्यात आली.
कोंढाळी पासुन 4 कि.मी अंतरावरील सालई (खुर्सापार) येथील प्रकाश कुंभारे यांचे 25 मार्च 2022 ला अल्प आजाराने निधन झाले त्यानंतर काही दिवसांनी स्टेट बैक आँफ इंडिया च्या शाखा प्रबंधकानी त्यांचे खाते तपासले असता खात्यातून प्रधानमंत्री जिवन ज्योती विमा योजनेची रक्कम जमा झाली होती यांची माहिती त्यांच्या पत्नी अनिता प्रकाश कुंभारे यांना देण्यात आली आज स्टेट बैक आँफ इंडिया कोंढाळी शाखा प्रबंधक पंकज तिमांडे यांच्या हस्ते स्टेट बैक आँफ इंडिचे अधिकारी मेघा कटकर,सुनिल बोकडे,नरेद्र सातपुते आदीच्या उपस्थीत अनिता प्रकाश कुंभारे यांना दोन लाख रूपयांचा चेक देण्यात आला.
फोटो…..स्टेट बैक आँफ इंडिया कोंढाळी चे शाखा प्रबंधक पंकज तिमाडे अनिता प्रकाश कुंभारे यांना दोन लाख रुपयांचा चेक देतांना…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *