प्रजासत्ताक दिन : राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे ध्वजवंदन
Summary
मुंबई, दि. 26 : देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्र राजभवन येथे राष्ट्रध्वज फडकावून ध्वजाला मानवंदना दिली. राष्ट्रगीत तसेच राज्यगीत झाल्यानंतर राज्य राखीव पोलीस दल व महाराष्ट्र पोलीस दलातर्फे सलामी देण्यात आली. राज्यपाल राधाकृष्णन यांनी पत्नी […]

मुंबई, दि. 26 : देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्र राजभवन येथे राष्ट्रध्वज फडकावून ध्वजाला मानवंदना दिली.
राष्ट्रगीत तसेच राज्यगीत झाल्यानंतर राज्य राखीव पोलीस दल व महाराष्ट्र पोलीस दलातर्फे सलामी देण्यात आली.
राज्यपाल राधाकृष्णन यांनी पत्नी सुमती यांचेसह राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व उपस्थित लहान मुलांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मिठाई वाटप केले.
000