पोलीस स्टेशन पवनी अंतर्गत रेती चोरी. दोन ट्रॅक्टर जप्त. दहा लक्ष दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी पवनी
प्रकरण अशा प्रकारे आहे की यातील सरतर्फे फिर्यादी पोलीस नाईक अजित वाहने बॅच नंबर 1209 पोलीस स्टेशन पवनी जिल्हा भंडारा यांना दिनांक 25-04-2023 चे 12:30 वाजेच्या च्या दरम्यान कुर्झा ते गोसे जाणारा रोड आठ किमी पश्चिम येथे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कूर्झा ते गोसेखुर्द गावाचे मधात डांबरी रोडावर यातील आरोपी ट्रॅक्टर चालक 1) सुरज शंकर लांजेवार वय 22 वर्षे राहणारा वाही तालुका पवनी 2) सोनालिका कंपनीच्या ट्रॅक्टरच्या फरार चालक यांनी संगणमत करून आपल्या ताब्यातील ट्रॅक्टरला संलग्न असलेल्या ट्रॉलीमध्ये रेतीची चोरी करून वाहतूक करताना मिळून आल्याने व आरोपी 2) याने ट्रॅक्टर घटनास्थळी सोबत पळून गेल्याने फिर्यादीच्या लेखि रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन पवनी येथे अपराधी क्रमांक 134/2023 कलम 379, 34 भादंवी सहकलम 50 (1) CMVR/177 मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हारगुडे हे करीत आहेत
मिळालेला माल 01) निळ्या रंगाचा विना क्रमांकाचा फॉर्म ट्रॅक कंपनीच्या ट्रॅक्टर ज्याचा इंजिन क्रमांक E2524250 व चेचीस क्रमांक T062523679HJ ला संलग्न निळ्या रंगाची विना क्रमांकाची ट्रॉली किमती पाच लक्ष रुपये ज्यामध्ये अंदाजे एक ब्रास रेती किमती पाच हजार रुपये ची 02) निळ्या रंगाच्या सोनालिका कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर ज्याचा इंजिन क्रमांक 3102N314C1039543F33 व चेचिस क्रमांक AZYSR104550953 ला संलग्न असलेली लाल रंगाची विना क्रमांकाची ट्रॉली किमती पाच लक्ष रूपये ज्यामध्ये एक ब्रास रेती किमती 5000 रुपयाची असा एकूण दहा लक्ष दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.