पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क दैनिक न्यूज पोर्टल तर्फे कर्तबगार महिलांचा सत्कार…

दिनांक 1 मे 2023 (चंद्रपूर वार्ता )
आयुष्य नगर दुर्गापूर येथे कर्तबगार महिला यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सखी महिला मंडळातर्फे समाजातील गोरगरीब गरजू कुटुंबाना अन्न-धान्याची, शैक्षणिक वस्तू पुरवण्याची मदत सदर मंडळातर्फे केली जाते. या मंडळातील सर्व महिलांनी कोरोना काळात बऱ्याच कुटुंबाना मदत केली. अश्या या कर्तबगार महिलांचे कौतुक करणे गरजेचे आहे म्हणून पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक तथा डारेक्टर माननीय श्री. राजकुमार खोब्रागडे व आयुष्य नगर मधील प्रतिष्ठीत महिला सौ. प्रीती येरेवार इंजिनियर CSTPS, यांच्या सयुक्त विद्यमानाने कर्तबगार महिलांच्या सामाजिक कार्याची दखल घेतं यांचे मनोबल वाढवण्यासाठी पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक तथा डारेक्टर माननीय श्री. राजकुमार खोब्रागडे यांच्या हस्ते जागतिक महिला दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.