पोलीस मुख्यालय भंडारा येथील भरोसा सेल येथे पुरुष पक्षाला करण्यात येते ब्लॅकमेल. लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचा आरोप

प्रतिनिधी भंडारा
महिलांची इच्छा शासकीय नोकरी करणाऱ्या पुरुषां सोबत लग्न करायची असते. थाटामाटात लग्न झाल्यानंतर शासकीय नोकरी करणाऱ्या पती सोबत पत्नी ही क्षुल्लक कारणांवरून भांडण करण्यास सुरुवात करते. पतीला मौल्यवान वस्तू खरेदी करून मागत असते. पती शासकीय नौकरीवर असल्याकारणाने पत्नीचे सर्व हट्ट पुरवीत असतो. कारण प्रस्तुत पतिजवळ पुरेसा पैसा असतो. हा पती गमावू नये म्हणून पत्नी आपल्या पतीवर शक घेणे चालू करते. क्षुल्लकशा कारणावरून आपल्या सासुसोबत भांडण करत असते. घरी नोकर चाकर असतात तरी सुद्धा पत्नी ही असमाधानी असते. पती आपल्या पत्नीला नोकरी लागावी म्हणून तिच्या शिक्षणावर पैसा खर्च करतो. तरीसुद्धा असमाधानी पत्नी ही क्षुल्लक शा कारणावरून मी नाही राहत, चालले माहेरी, जाणार तर येणारच नाही. अश्या धमक्या आपल्या नोकरी करणाऱ्या पती ला तसेच आपल्या सासू सासऱ्यांना, दिर, नंनद ला देते. तरीसुद्धा पत्नी ला तिचे सासरचे माणसं तिला घर सोडून जाऊ देत नाही. मग पत्नी ही आपल्या माहेरी फोन करते व मला इथून घेऊन जावे अशी मागणी करते व माहेरचे पतीच्या घरी येऊन भांडण करतात व पत्नी आपल्या दुधावरच्या लेकरू ला सोडून पोलीस स्टेशन मध्ये जाऊन महिला सुरक्षा कायद्यांमध्ये जे काही नमूद असते त्या सर्व कायद्यान्वये आपल्या पती तसेच सासू, सासरे, दिर, नणंद, पतीचे आप्त स्वकियांवर गुन्हे दाखल करते. घरी परत आल्यावर पतिच्या घरचे सोने, पैसा दागिने घेऊन माहेरी निघुन जाते. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट चे कित्येक जजमेंट आहेत की हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचार सारख्या महिला सुरक्षा कायद्यांचा दुरुपयोग होत आहे. म्हणून अशा महिलांना मानसिक समुपदेशन करण्याच्या हेतूने पोलीस मुख्यालय भंडारा येथे माननिय भरोसा सेलची निर्मिती करण्यात आली आहे.
परंतु पोलीस मुख्यालय भंडारा येथील माननिय भरोसा सेल येथे वेगळेच चित्र बघायला मिळत आहे. येथे महिला सुरक्षा कायद्यांचा दुरुपयोग होत असून पुरुष पक्षाला अनेक वर्षांपासून धमकवण्यात येत असून पुरुष पक्षाकडून उलट सुलट मार्गाने उलटे सीधे बयाण लिहून घेण्यात येत आहे सोबत भंडारा भरोसा सेल येथील महिला पोलिस आपल्या सोबत अनधिकृत पुरूष पोलीस सुद्धा अनेक वर्षांपासून ठेवत आहेत. व पुरुष पक्षाला ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून खंडणी गोळा करीत आहेत. त्यामुळे भंडारा भरोसा सेल येथे पुरुष पक्षाला बोलावण्यात आल्यास पुरुषांनी तिथे जाऊ नये व दिवाणी न्यायालय अथवा कौटुंबिक न्यायालयात दाद मागावी असा सल्ला तसेच आव्हाहन लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे प्रदेश महासचिव अमर वासनिक यांनी पीडित पुरुष पक्षांना केले आहे.