-: पोलीस भंडारा जिल्हयातील औधोगिक क्षेत्रातील उद्योजकांची बैठक संपन्न झाली :-

मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य म.रा. मुंबई यांचे १०० दिवसांचे सात कलमी कृती आराखडयाचे अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक साहेब भंडारा यांचे दालनात भंडारा जिल्हयातील सनफ्लॅग कंपनी वरठी, अशोक लेलॅन्ड कंपनी गडेगाव व MIDC क्षेत्रातील कंपनीचे प्रमुख यांची मिटींग घेण्यात आली.
सदर मिटींगमध्ये मा. नूरूल हसन पोलीस अधीक्षक भंडारा यांनी उपस्थित आलेल्या कंपनीचे प्रमुख यांना मार्गदर्शन करून मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य म.रा. मुंबई यांचे १०० दिवसांचे सात कलमी कृती आराखडयाचे पालन करण्या बाबत सुचना दिल्या. आणि भंडारा जिल्हयात औध्योगीक क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त रोजगार कसा वाढवीता येईल तसेच जास्तीत जास्त उत्पादन वाढवुन राज्याचे जिडीपी मध्ये वाढ करण्यास कशी मदत करता येईल याबाबत कंपनीचे प्रमुख यांचेशी सविस्तर चर्चा केली. तसेच औध्योगीक क्षेत्रातील कंपण्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या सुरक्षे संबंधाने काही समस्या आल्यास तातडीने संबंधीत पोलीस स्टेशन यांना संपर्क करण्याबाबत तसेच कंपण्यांमार्फत काही सामाजीक उपक्रम राबवीणे, ई लायब्ररी तयार करणे व रोजगार मेळावा घेवुन रोजगार निर्मीती करणे याबाबत आणि जिल्हयातील कंपनीचे प्रमुख व मॅनेजर यांचे व्हॉस्टअप ग्रुप तयार करून कंपनीव्दारे राबविण्यात योणरे उपक्रम, वेळोवळी उदभवणाऱ्या समस्याची देवाणघेवाण करण्या बाबत मार्गदर्शन केले. भंडारा जिल्हयातील कंपनीचे प्रमुख यांनी नेहमी पोलीस प्रशासन व जिल्हाधीकारी कार्यालय भंडारा यांचे संपर्कात राहुन कोणताही ईसम दबाव आणुन खंडणीची मागणी करीत असेल किंवा धमकी (ब्लॅकमेल) करीत असेल तर त्याबाबत त्वरीत संबंधीत पोलीस स्टेशन व जिल्हा प्रशासन यांना माहीती द्यावी जेणे करून संबंधीत ईसमावर ताक्ताळ योग्य कारवाई करून गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.
सदर मिटींगमध्ये सनफ्लॅग कंपनी, अशोक लेलॅन्ड कंपनी, क्लेरीयन ड्रग्ज कंपनी देव्हाडी, वैनगंगा साखर कारखना देव्हाडा, युरीडेरीअंट कंपनी माडगी व मोहाडी, लाखनी, लाखांदुर परीसरातील MIDC क्षेत्रातील कंपनीचे प्रमुख व पदाधिकारी हजर होते.