BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

पोलीस ठाण्यांमधील कार्यरत रोजंदारी सफाई कामगारांसाठी किमान वेतनाबाबत कार्यवाही करावी – गृह राज्यमंत्री योगेश कदम

Summary

मुंबई, दि. ७: राज्यातील पोलिस ठाण्यांमधील आस्थापनेवर कार्यरत रोजंदारी सफाई कामगारांसंदर्भात २७ जानेवारी २०१७ च्या शासन अधिसूचनेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार किमान वेतनाबाबत कार्यवाही करण्यात यावी,  असे निर्देश गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. राज्यमंत्री […]

VIRENDRA DHURI

मुंबई, दि. ७: राज्यातील पोलिस ठाण्यांमधील आस्थापनेवर कार्यरत रोजंदारी सफाई कामगारांसंदर्भात २७ जानेवारी २०१७ च्या शासन अधिसूचनेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार किमान वेतनाबाबत कार्यवाही करण्यात यावी,  असे निर्देश गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

राज्यमंत्री योगगेश कदम म्हणाले, राज्यात विविध पोलिस ठाण्यात १८०० रोजंदारी कर्मचारी कार्यरत आहेत. या कामगारांना अन्य विभागामध्ये देण्यात येत असलेले वेतन, भत्ते याप्रमाणे लाभ देण्यात यावे. राज्यातील सर्वच रोजंदारी सफाई कामगारांना समान वेतन असावे. त्यानुसार गृह विभागातील रोजंदारी सफाई कामगारांनाही वेतन देण्यात यावे.

VIRENDRA DHURI

विभागातील कायम असलेल्या सफाई कामगारांना लाड – पागे समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात. या कामगारांना २०१७ च्या शासन निर्णयानुसार वेतन अदा करताना मागील थकबाकीही देण्याबाबत चर्चा केली असून, कुठल्याही सफाई कामगारावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्यमंत्री श्री कदम यांनी दिले.

बैठकीस पोलिस महानिरीक्षक (प्रशासन) अभिषेक त्रिमुखे, उपसचिव रवींद्र पाटील, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाचे उदय भट, जीवन सुरुडे आदी उपस्थित होते.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *