पोलीस उपनिरीक्षक धवल देशमुख यांना महाराष्ट्र पोलीस दलामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहिर
Summary
काटोल/कोंढाळी- पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह हे महाराष्ट्र पोलिसांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट सेवा आणि अनुकरणीय वर्तनासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. विशिष्ट कालावधीसाठी विशिष्ट आणि स्वच्छ प्रतिमेसह सेवा केलेल्या सर्व श्रेणीतील पोलिस अधिकाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्र दिनासोबत […]

काटोल/कोंढाळी-
पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह हे महाराष्ट्र पोलिसांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट सेवा आणि अनुकरणीय वर्तनासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. विशिष्ट कालावधीसाठी विशिष्ट आणि स्वच्छ प्रतिमेसह सेवा केलेल्या सर्व श्रेणीतील पोलिस अधिकाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्र दिनासोबत (1 मे) दिला जातो. महाराष्ट्र पोलिसांत उल्लेखनीय कामगिरी, अनुकरणीय आचरण आणि कर्तव्याप्रती समर्पण यांचा गौरव करणारा हा एक प्रतिष्ठित सन्मान आहे.
धवल अशोकराव देशमुख हे सध्या कोंढाळी पोलीस स्टेशन नागपूर ग्रामीण येथे कार्यरत असून, यापूर्वी हिंगोली, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सेवा बजावलेली आहे सन *2020 ते 2023* या कालावधीमध्ये ते उप पोलीस स्टेशन पेरमिली, गडचिरोली या नक्षालदृष्ट्या अतिसंवेदनशील भागात ठाणेदार म्हणून कार्यरत होते, या दरम्यान त्यांनी तेथील नागरिक शासनाच्या मुळ प्रवाहामध्ये सहभागी व्हावे व माओवादी गुंडाच्या फौजेपासून दूर व्हावे याकरिता तत्कालीन पोलीस अधीक्षक यांचे मार्गद्शनाखाली *स्वयंस्फूर्तीने लोकउपयोगी नाविन्यपूर्ण उपक्रम उदा. गाव तिथे वाचनालय, शेवगा शेती, राखी विथ खाकी, परसबाग, काजु शेती, मत्स्यपालन, कृषी मेळावे, ऑनलाईन वाहन परवाना शिबिर, डिजिटल 7, 12, आरोग्य तपासणी शिबिर, मोफत चष्मे वाटप, गरजू शाळकरी विद्यार्थ्यांना सायकल वाटप, अपंगांना तीन चाकी सायकल वाटप, मुलांना पुस्तके व खेळाचे साहित्य वाटप करणे, निराधार वृद्ध महिलेचे घर बांधकाम, यंदाची दिवाळी आदिवासी बंधवांसोबत, शाळांमध्ये देशभक्तीपर निबंध स्पर्धा, 18 नागरिकांच्या नागपूर येथे मोफत शस्त्रक्रिया, अंधश्रद्धा निर्मूलन शिबिरे ई लोककल्याणकारी उपक्रम राबवले. तसेच गडचिरोली येथे कार्यरत असताना नक्षलवाद्यांकडून ग्राम चंद्रा येथील बांडिया नदीवरील पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे अपहरण करून 70 लाख रुपयांची खंडणी मागितली होती, सदर गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून 11 आरोपी अटक केले ( 04 जनमीलेशिया ) तसेच 22 भरमार रायफल, 19 जिवंत काडतुसे व मॅगझिन, नक्षल साहित्य हस्थगत केले होते यामुळे तेथील बांधकाम ठेकेदारांनी गडचिरोली पोलीस दलाचे आभार व्यक्त केले होते, यामुळेजनसामान्यांमध्ये सकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये अतिसंवेदनशील पेरमिली हद्दीमध्ये नक्षलवाद्यांकडून कोणताही अनुचित प्रकार घडु दिला नाही तसेच तेथील एकही नागरिक नक्षल दलम मध्ये भरती झाला नाही, ते सतत तेथील जनता व पोलीस यांचे संबंध वृद्धिंगत करण्यामध्ये प्रयत्नशील राहिले. *नक्षलविरोधी अभियान व सिव्हिक ऍक्शन मध्ये उत्कृष्ट कामगिरीबाबत त्यांना गडचिरोली पोलिस दलातर्फे सतत दोनवेळा कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफिसर ऑफ दि इयर या पुरस्काराने सुद्धा गौरविण्यात आले आहे.
त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये उत्कृष्ट सेवा व उल्लेखनीय कामगिरी केल्याबददल त्यांना यावर्षी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र यांचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले याचे श्रेय ते त्यांचे आई, वडील, पत्नी, सर्व सन्माननीय वरिष्ठ अधिकारी व सर्व सहकारी अधिकारी व अंमलदार यांना देतात 1 मे रोजी पालकमंत्र्यांच्या हस्थे पोलीस मुख्यालयामध्ये सदर पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे बाबतची माहिती कोंढाळी पोलीस स्टेशन क्षेत्रातील नागरिकांना मिळताच विविध सामाजिक, धार्मिक, राजकिय, क्रीडा, शैक्षणिक सांस्कृतिक संघटना, पोलीस पाटील, शांतता कामेटी पदाधिकारी, महीला संघटना व स्थानिकांनी धवल देशमुख यांचे अभिनंदन केले आहे.