BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

*पोलिसांनी तरुणींना कपडे काढून नाचायला लावलं, महिला वसतिगृहात धक्कादायक प्रकार*

Summary

जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील पुरुष मंडळी या कृत्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. सामाजिक संघटनांनी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. (Police allegedly made Girls Dance […]

जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील पुरुष मंडळी या कृत्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. सामाजिक संघटनांनी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. (Police allegedly made Girls Dance in Jalgaon Women’s Hostel)

*शासकीय आशादीप महिला वसतिगृहातील प्रकार*

जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा आरोप केला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे या कृत्याचा व्हिडीओही सादर केला. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तातडीने दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

*वसतिगृहातील गैरप्रकाराच्या तक्रारी*

महिला आणि बालकल्याण विभागामार्फत गणेश कॉलनीतील वसतिगृहात निराधार आणि अन्याय, अत्याचार झालेल्या महिला आणि मुलींच्या निवारा-भोजनाची व्यवस्था केली जाते. या वसतिगृहात गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी होत्या.

जननायक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, फरीद खान, मंगला सोनवणे यांनी वसतिगृह, गाठून महिला आणि मुलींना भेटून माहिती जाणून घेतली असता एक मार्च रोजी काही पोलीस कर्मचारी आणि बाहेरील पुरुषांनी मुलींना कपडे काढून जबरदस्तीने नृत्य करायला भाग पाडल्याचा प्रकार समोर आला.

*चौकशीच्या नावाखाली पोलिसांकडून अनैतिक कृत्य*

काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने,. बाहेरील लोकांना आणि पोलिसांना चौकशीच्या नावाखाली आतमध्ये प्रवेश देऊन अनैतिक कृत्य केले जात असल्याची कैफियत काही मुलींनी मांडली. ज्या मुली चुकीच्या कृत्यांना नकार देतात, त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली जाते. सामाजिक कार्यकर्त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता, मुली बाहेरुनच खिडकीतून आपल्यावर बेतलेले प्रसंग ओरडून सांगत होत्या. या मुली बोलण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनाही संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून मज्जाव केला जात होता.
✍️ *प्रशांत जाधव*
नवी मुंबई न्यूज रिपोर्टर
9819501991

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *