पोलिसांचा खबऱ्या समजून ४०९ जणांची केली हत्या, माओवाद्यांचा खळबळजनक कबुलीनामा
Summary
माओवाद्यांनी हे बुकलेट जारी केले आहे. त्यात अनेक धक्कादायक खुलासे माओवाद्यांनी केले आहेत.माओवाद्यांनी हे बुकलेट जारी केले आहे. त्यात अनेक धक्कादायक खुलासे माओवाद्यांनी केले आहेत. गडचिरोली, १६ नोव्हेंबर :माओवाद्यांनी दंडकारण्यासह देशातल्या माओवादप्रभावीत भागात गेल्या पाच वर्षात पोलीस खबऱ्या ठरवून आतापर्यंत […]

माओवाद्यांनी हे बुकलेट जारी केले आहे. त्यात अनेक धक्कादायक खुलासे माओवाद्यांनी केले आहेत.माओवाद्यांनी हे बुकलेट जारी केले आहे. त्यात अनेक धक्कादायक खुलासे माओवाद्यांनी केले आहेत.
गडचिरोली, १६ नोव्हेंबर :माओवाद्यांनी दंडकारण्यासह देशातल्या माओवादप्रभावीत भागात गेल्या पाच वर्षात पोलीस खबऱ्या ठरवून आतापर्यंत ४०९ नागरिकांची हत्या केल्याचा खळबळजनक दावा माओवाद्यांनी केला आहे. या संदर्भातलं एक बुकलेट जारी केले आहे. पीपल्स गुरील्ला आर्मी या माओवाद्याच्या सशस्त्र संघटनेच्या निर्मितीला २२ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी हे बुकलेट जारी केले आहे. त्यात अनेक धक्कादायक खुलासे माओवाद्यांनी केले आहेत.गेल्या पाच वर्षात माओवाद्यांनी पोलीस खबऱ्याच्या आरोपाखाली तब्बल ४०९ नागरिकांची हत्या केल्याची बुकलेटमध्ये कबुली दिली आहे. तर दंडकारण्यात वेगवेगळया १३००हल्ल्यात ४२९ जवानांच्या हत्येची तसेच ९६६ जवान जखमी झाल्याची कबुली माओवाद्यांनी दिली आहे.
त्या दरम्यान जवानाकडील ८५अत्याधुनिक शस्त्रासह हजारो जिवंत काडतुसे माओवाद्यांनी पळवली आहेत. पाच वर्षात दोन आमदारांसह ४० लोकप्रतिनिधीची हत्या केल्याची कबुलीही या बुकलेटमध्ये माओवाद्यांनी दिली आहे.
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या अकरा महिन्यात १३२ माओवादी ठार झाले असून गेल्यावर्षीच्या मर्दीनटोलाच्या चकमकीत जहाल माओवादी मिलिंद तेलतुंबडेसह २७ माओवादी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाल्याची घटना माओवादी संघटनेसाठी मोठा नुकसान असल्याच माओवाद्यांनी मान्य केलंय.