हेडलाइन

पोपट, वाघ, व डुक्कर

Summary

पोपट, वाघ, व डुक्कर ————————– एका झाडाखाली पोपट, वाघ आणि डुक्कर राहत होते. त्यांची खूप मैत्री होती. इतकी अजब गजब की ते एकमेकांशिवाय अजिबात राहू शकत नव्हते.एके दिवशी वादळ आलं, आणि त्या वादळामध्ये झाड कोसळून खाली पडले.   आणि त्या […]

पोपट, वाघ, व डुक्कर

————————–

एका झाडाखाली पोपट, वाघ आणि डुक्कर

राहत होते. त्यांची खूप मैत्री होती. इतकी अजब गजब की ते एकमेकांशिवाय अजिबात राहू शकत नव्हते.एके दिवशी वादळ आलं, आणि त्या वादळामध्ये झाड कोसळून खाली पडले.

 

आणि त्या अपघाती प्रसंगा मध्ये पोपट मरण

पावला.

 

आपला मित्र मरण पावल्यामुळे दु:खातिरेकाने वाघ आजारी पडला आणि त्या आजारातच त्याचा मृत्यू झाला.

 

आपले दोन्ही मित्र मरण पावल्यामुळे

डुक्कराला अतिशय दु:ख झाले. त्या परीस्थिती मध्ये त्याला जगणे असह्य झाले, आणि त्यानेसुद्धा त्याच ठिकाणी आपले प्राण सोडले…

 

तिघांच्याही मृतदेहाचे एकाच ठिकाणी तिथल्या मातीमध्ये विघटन झाले.

 

खूप दिवसांनी ज्या ठिकाणी पोपट वाघ आणि डुक्कर मरण पावले होते त्या ठिकाणी एक झाड रुजू लागले…

 

पुढे ते झाड मोठे झाले. काही दिवसांनी ते झाड सुंदर व वेगळ्याच सुगंधाची फूले आली. इतकी कि त्या फूलांच्या सुगंधाने मोहित होऊन माणसे त्या झाडाकडे ओढली जाऊ लागली. म्हणूनच कोणीतरी त्या झाडाला “मोहाचे झाड” असे संबोधायला सुरूवात केली.

 

पुढे कोणातरी प्रयोगशील माणसाने त्या सुगंधी फूलापासून पेय बनवले. लोक त्याला “मोहाची दारू” म्हणायला लागले..

 

पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी पोपट, वाघ आणि डुक्कर या तीन परममित्रांचा देह विलीन झाला होता त्या ठिकाणी उगवलेल्या या झाडाच्या फूलांमध्ये त्या तीनही मित्रांचा गुणधर्म आलेला होता.

 

आणि म्हणूनच ज्या वेळी माणूस दारू पितो

त्यावेळी पहिल्यांदा त्याचा पोपट होतो..

आणि तो पोपटासारखा बोलू लागतो…!

 

आणखिन थोडी दारू घेतली कि थोड्या वेळाने तो वाघ होतो.. आणि कुणालाही न घाबरता तो वाट्टेल ते बोलू लागतो, कुणाचेच तो ऐकत नाही..!

 

जरा अधिक दारू झाली किंवा सर्वात शेवटी त्याचा डुक्कर होतो. आणि मग ज्या प्रमाणे डुक्कर चिखलात लोळतो.. त्याचप्रमाणे तो रस्त्यावर गटारात लोळतो….!

 

गटारी जवळ येते आहे, आपल्याला दारूच्या गुणधर्मांचा इतिहास माहीत असावा म्हणून हा माहिती प्रपंच….!

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *