चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

पोंभुर्णा तहसील कार्यालय दुरुस्तीसाठी ३० लाख रुपयाची प्रशासकीय मान्यता बोर्डा येथे होणार नवीन तलाठी कार्यालय

Summary

चंद्रपूर, दि. ९ : पोंभूर्णा तहसील कार्यालयाच्या देखभाल दुरुस्तीसाठी ३० लाख आणि बोर्डा (ता. चंद्रपूर) येथे नवीन तलाठी कार्यालयासाठी ३० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम सन […]

चंद्रपूर, दि. ९ : पोंभूर्णा तहसील कार्यालयाच्या देखभाल दुरुस्तीसाठी ३० लाख आणि बोर्डा (ता. चंद्रपूर) येथे नवीन तलाठी कार्यालयासाठी ३० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.

जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम सन 2023-24 अंतर्गत शासकीय कार्यालयीन इमारत दुरुस्ती बाब 27-लहान बांधकामे अन्वये, पोंभुर्णा, तहसील कार्यालयाच्या इमारत दुरूस्त करण्यात येणार आहे . त्यासोबतच, शासकीय कार्यालयीन इमारत बांधकाम  बाब 53-मोठी बांधकामे या शिर्षा खाली, बोर्डा येथील तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. याबाबत या भागातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *