पेंच पाटबंधारे चा बोरी (सिंगोरी) गावात कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे नुकसान शेतक-यांच्या ८० एकरावरील गहु व हरभरा पिक पाण्यात बुडुन नुकसानीने शेतकरी हतबल.

कन्हान : – तालुकातिल पेंच पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या टेकाडी उपविभागातील बोरी (सिंगोरी) गाव शेतशिवारातील कालवा फुटल्याने गावातील १६ ते २० शेतकऱ्यांचे उभे असलेले गहु व हरभरा पिके पुर्णपणे पाण्यात बुडाल्याने शेतपिक उद्ध्वस्त झाल्या ने शेतकरी हतबल झाला आहे.
मंगळवार (दि.२७) ला सकाळी शेतकरी शेतात गेले तर त्यांच्य शेतात पाणीच पाणी साचुन शेत पिक पाण्यात बुडाली बघायला मिळाले. त्यांच्या शेतातील गहु, हरभरा पिकांमध्ये पाणी शिरले पाहुन त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. शेतकऱ्यांनी सकाळी आठ वाजता पाटबंधारे अधिकाऱ्यांना कळवले. त्यांनी थेट शेतकऱ्यांशी उलट बोलणे सुरू केले. याबाबत तहसिलदार प्रशात सांगळे यांना माहिती दिली. पेंच पटबंधारेच्या अधिका-यांनी कालवा बनविताना निष्का ळजीपणा व व्यवस्थित कालव्याचे (नहराचे) काम कंत्राटव्दारा कडुन करून न घेतल्याने हा कालवा फुटुन आम्हा शेतक-यांच्या उभ्या पिकाचे नुकसान होऊन तोंडता घास हिसकावल्या गेल्याने या नुकसानी चे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्या त यावी. तसेच संबधित पाटबंधारे विभागातील अधि कारी व जवाबदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थानी केली आहे.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्यूरो
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क