पुर्व मंजुरीची १६ सप्टेंबर सुट्टी कर्मचाऱ्यांचे नुकसान न करण्याची सेना युनियनची मागणी
Summary
महाराष्ट्र शासनाने दरवर्षीप्रमाणे दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी “ईद-ए-मिलाद”या सणाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. त्यानुसार पालिकेतील अनेक कामगार,कर्मचारी,अधिकारी यांनी सलग सुट्टीच्या दृष्टीकोनातुन दि. १६ सप्टेंबर रोजी सुट्टीला अनुसरुन प्रवाससहाय्य भत्ता व नियमित स्वरुपात पूर्व मंजुरीने सुट्टी घेऊन ती उपभोगण्यासाठी […]

महाराष्ट्र शासनाने दरवर्षीप्रमाणे दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी “ईद-ए-मिलाद”या सणाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. त्यानुसार पालिकेतील अनेक कामगार,कर्मचारी,अधिकारी यांनी सलग सुट्टीच्या दृष्टीकोनातुन दि. १६ सप्टेंबर रोजी सुट्टीला अनुसरुन प्रवाससहाय्य भत्ता व नियमित स्वरुपात पूर्व मंजुरीने सुट्टी घेऊन ती उपभोगण्यासाठी आपल्या गावी तसेच बाहेरगावी गेले होते.
महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढल्याने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने देखील ईद-ए-मिलाद सणानिमित्त सोमवारी १६ सप्टेंबर २०२४ रोजीची सुटी रद्द करून त्याऐवजी बुधवारी १८ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. मात्र कामगार,कर्मचारी,अधिकारी यांनी घेतलेली सुट्टी रद्द करुन, (गावावरुन येणे/त्यांच्या कुटुंबियांसह केलेला प्रवास अचानक रद्द करुन) दि. १६ सप्टेंबर रोजी त्यांना कर्तव्यावर हजर होणे शक्य झालेले नाही. अश्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या सलग सुट्ट्यांचा लाभ त्यांना देण्यात यावा तसेच त्यांचे कोणत्याही प्रकारे आर्थिक नुकसान करु नये अशी मागणी “म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ.संजय कांबळे- बापेरकर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.