पुण्यातील व्यापारांच्या लढ्यास यश दुकाने राञी ८ ते हॉटेल व बार १० वाजेपर्यंत चालू
पुणे
पञकार -सागर घोडके
पुण्यातील व्यापारांच्या लढ्यास यश
दुकाने राञी ८ ते हॉटेल व बार १० वाजेपर्यंत चालू
दुकानाच्या वेळा बदलण्या बाबत प्रशासनाकडे पुणे व्यापारी संघांने मागणी केली होती. परंतु त्याच्या या मागणीला यश आले नव्हते. इकडे व्यापारी आपल्या मागण्यांवर ठाम होते तर दुसरीकडे प्रशासन वेळेत सुट देण्यास तयार नव्हते. त्यामुळे प्रशासनाला व्यापारी वर्गने दोन दिवसाचा अल्टिमेटम दिला होता.
रविवारी घेण्यात आलेल्या कोरोना आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील पॉझिटिव्हिटी रेट कमी होते असल्याने निर्बंधात काही प्रमाणात सुट देण्यास आली.
पुण्यातील सर्व दुकाने सकाळपासून राञी ८ वाजेपर्यंत चालू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. तर हॉटेल व बार राञी १० वाजेपर्यंत चालू राहणार आहे. त्याचप्रमाणे मॉलही उघडण्यास परवानगी दिली आहे, माञ कोरोना प्रतिबंधक दोन्ही लसीचे डोस घेणाऱ्यास मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे.