पुणे महाराष्ट्र हेडलाइन

पुणे जिल्ह्यातील मावळ व पिंपरी चिंचवडची तहान भागवणारे पवना धरण ९६.८९ टक्के भरले

Summary

पुणे( मावळ) – मावळ तालुक्यातील पवना धरण हे मावळ तालुक्यातील गाव व पिंपरी चिंचवड शहराची तहान भागविण्यासाठी उपयोगास येते. तसेच मावळ तालुक्यातील शेती प्रमुख्याने पवना नदीच्या पाण्यावर अवलंबून असते. धरण ९६.८९ टक्के भरल्याने वर्षे भराचा प्रश्न मिटला आहे. पवना धरण […]

पुणे( मावळ) – मावळ तालुक्यातील पवना धरण हे मावळ तालुक्यातील गाव व पिंपरी चिंचवड शहराची तहान भागविण्यासाठी उपयोगास येते. तसेच मावळ तालुक्यातील शेती प्रमुख्याने पवना नदीच्या पाण्यावर अवलंबून असते. धरण ९६.८९ टक्के भरल्याने वर्षे भराचा प्रश्न मिटला आहे.
पवना धरण परिसरात गेल्या २४ तासात १० मिमी पावसाची नोंद झाली आहे.तसेच १ जून पासून
धरण क्षेत्रात २०५९ मिमी मिटर पाऊस पडला आहे. धरणाच्या क्षेत्रात १ जून पासून ६५.३० टक्के पाणीसाठात वाढ झाली आहे. अशी माहिती पवना धरण पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
धरण साठ्यात वाढ झाल्याने वर्षे भर पुरेल एवढा साठा निर्माण झाला आहे. तसेच धरण क्षेत्रात रिमझिम स्वरूपात पाऊस पडत आहे
पुणे (मावळ)पत्रकार – सागर घोडके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *