पीथौरागढ येथील टेलीमेडीसिन सेवेचा राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत शुभारंभ
Summary
मुंबई, दि. 1 : डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून आज सीमान्त सेवा फाउंडेशन, पीथौरागढ, उत्तराखण्ड या संस्थेतर्फे देशाच्या पहाडी सीमा भागातील लोकांना आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने सुरु केलेल्या टेलीमेडीसिन सेवेचा शुभारंभ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत करण्यात आला. पीथौरागढ […]
मुंबई, दि. 1 : डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून आज सीमान्त सेवा फाउंडेशन, पीथौरागढ, उत्तराखण्ड या संस्थेतर्फे देशाच्या पहाडी सीमा भागातील लोकांना आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने सुरु केलेल्या टेलीमेडीसिन सेवेचा शुभारंभ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत करण्यात आला.
पीथौरागढ जिल्ह्यातील थेट नेपाळ – चीन सीमेजवळ वसलेल्या गावांना आरोग्य सुविधा देण्याचा पीथौरागढ येथील डॉक्टरांचा उपक्रम प्रशंसनीय आहे. टेलीमेडीसिनमुळे सद्य युगात क्रांती झाली आहे. या सेवेशी अनेक चांगले डॉक्टर्स जोडले जातील व त्यातून जनसामान्यांना आरोग्यलाभ होईल, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.
ऑनलाईन कार्यक्रमाला डॉ.स्वामी गुरुकुलानन्द सरस्वती, डॉ.जे बी मानस अकादमीचे अध्यक्ष डॉ.अशोक पंत, ललित पंत, डॉ.एच सी पंत, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पीथौरागढ तसेच अनेक डॉक्टर्स उपस्थित होते.