पीक कर्ज वाटपासाठी कर्ज मेळावे घ्यावे पालकमंत्री डाॅ. नितीन राऊत पोलिस योध्या न्यूज़ नेटवर्क ला मिळालेल्या महितीनुसार पालकमंत्री डाॅ. नितीन राऊत यांची खरिप आढावा बैठकीत सूचना ग्रामस्तरावर कृषी आराखडे तयार करा!
नागपूर, 10 मे – शेतकर्यांना कर्ज वाटपासाठी काेराेनाच्या पार्श्वभूमीवर बँकांनी कर्ज मेळावे घेण्यासाठी राज्य सरकारने निर्देश जारी करावे, अशी सूचना नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी आज खरिप आढावा बैठकीत केली.
शेतकर्यांनी शेती हंगामात काेणते पीक घ्यावे, यासाठी ग्राम स्तरावर कृषी विकास आराखडे तयार करण्यात यावे,अशी सूचना डाॅ. नितीन राऊत यांनी केली. यासाठी गटविकास अधिकार्यांवर जबाबदारी साेपवावी.
नागपूर विभागाची खरिप आढावा बैठक आज नागपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात पार पडली. अध्यक्षस्थानी कृषी मंत्री दादाजी भुसे हाेते.
यावेळी बाेलताना नागपूरचे पालकमंत्री डाॅ. नितीन राऊत म्हणाले, काेराेना काळामुळे शेतकर्यांची स्थिती चांगली नाही. तसेच अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे येणार्या खरिप हंगामासाठी शेतकर्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. काेराेनाच्या नियमांमुळे शेतकर्यांना बँकांमध्ये जाणे व तेथे प्रस्ताव दाखल करून कर्ज मंजूर करून घेणे साेईस्कर राहिलेले नाही. त्यामुळे बँकांना गावागावांमध्ये जाऊन कर्ज मेळावे घ्यावे, अशी सूचना डाॅ. नितीन राऊत यांनी यावेळी केली.
युरियाचा साठा वाढवावा
नागपूर जिल्ह्यासाठी युरियाच्या बफर साठ्यामध्ये वाढ करावी, अशी सूचनाही यावेळी डाॅ. राऊत यांनी केली. नागपूर जिल्ह्याला 4361 मेट्रीक टनचे लक्षांक दिले आहे. नागपूर जिल्हयातील शेतकर्यांकडून युरीयाची मागणी वाढत असल्याने ही साठा मर्यादा 10 हजार मेट्रीक टनपर्यंत वाढवावी, अशी सूचनाही डाॅ. राऊत यांनी केली.
मनरेगाची अंमलबजावणी करावी
मनरेगा याेजनेअंतर्गत लहान शेतकर्यांना लाभ दिला जाताे. परंतु माेठ्या शेतकर्यांना या याेजनेचा लाभ मिळाला पाहिजे. या शेतकर्यांना अद्याप अनुदान मिळाले नाही. या याेजनेअंतर्गत राज्य सरकारने अनुदान द्यावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
कृषी विभागात पदभरती व्हावी
कृषी विभागात कृषी अधिकारी, कृषी सहाय्यकांची अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे त्वरित भरावी, अशी सूचना डाॅ. राऊत यांनी केली.
थेट ग्राहकांपर्यंत शेत मालाची विक्री करण्यासाठी नागपुरात शेतकरी गटांना काही स्थळ निश्चिती केली आहे. या याेजनेची व्याप्ती वाढविण्याची आवश्यकता असून यामुळे शेतकर्यांना शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत विकण्याची सुविधा मिळेल, अशी सूचना पालकमंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी केली.
श्री राकेश ज्ञानहर्ष
नागपुर विभागीय प्रमुख संवाददाता
8484874218