पिडीत चौधरी परिवारास योग्य न्याय पाहिजे
पिडीत चौधरी परिवारास योग्य न्याय पाहिजे
सर्व समाज बांधवाना सुचित करण्यात येत आहे , गोंदिया जिल्हा तिरोडा तालूका अंतर्गत येणारा बेल्हाटी गावातील एक गरीब कृषक परिवारातील नामे दिपककुमार ऋतुराज चौधरी वय सुमारे ३४ वर्ष त्यांच्या परिवारात त्यांची पत्नी व दोन मुली आहेत त्यांचा वय सुमारे ८ व ६ वर्षे अशा प्रकारे आहे , दिपक ऋतुराज चौधरी यांना सर्पडास झाले, त्यांना उपचारासाठी गोंदिया के टि एस शासकीय ऋग्णालय मध्ये दाखल करण्यात आले होते , त्यानंतर त्यांना पुढील उपचारास स्टार सिटी हास्पिटल नागपुर येथे दाखल करण्यात आले होते ,स्टार सिटी हास्पिटल च्या डाक्टरांनी ऋग्णाची परिस्थिति मध्ये फार चांगला सुधार होत आहे असा इशारा परिवारास व नातेवाईकांना दिला , पण असे काय झाले की संध्याकाळी ऋग्णाची परिस्थिति एकदम बरोबर पण रात्रि ऋग्ण केव्हा मरण पावला हे डाक्टरांना व कर्मचारी यांना ठाउक नाही , स्टार सिटी हास्पिटल चे कर्मचारी यांची लापरवाही या घटनेला जवाबदार आहे असा संसय ऋग्णाच्या परिवारांनी व नातेवाईकांनी व्यक्त केला आहे , आम्ही लाखों रुपए खर्च करुन सुध्दा स्टार सिटी हास्पिटल च्या डाक्टरांनी व कर्मचारी यांनी आमच्या ऋग्णाकडे फार मोठा दुर्लक्ष केला आहे , मनापासून पौसे खर्च करुन सुध्दा योग्य व नियमित उपचार न झाल्यामुळे ऋग्ण दिपक चौधरी यांचा दुःख दायक मृत्यु झाला त्यामुळे चौधरी परिवारात व नागपुर पोवार समाज संगठनेत असंतोष निर्माण झालेला आहे , आता काही ही केल्यास दिपक चौधरी तर परत येणार नाही पण परिवाराची व्यथा पाहुण आता साकारात्मक दृष्टिकोण ठेउन पिडीत चौधरी परिवारास योग्य न्याय मिळवून देने ही आमची सर्वांची जवाबदारी आहे असा ध्येय ठेवून पोवार समाज एकता मंच पुर्व नागपुर चे अध्यक्ष श्री सुनीलजी बिसेन , पोवार समाज संगठन बुट्टेबोरी चे अध्यक्ष श्री येजेन्द्रसिंगजी ठाकुर , श्री यशवंतजी गुड्डु राहागंडाले पोवार समाज एकता मंच संरक्षक , श्री हिरदीलालजी ठाकरे संरक्षक पोवार समाज एकता मंच , पोवार समाज संगठन कुकडे ले आउट चे अध्यक्ष श्री प्रुथ्वीराजजी राहागंडाले, माहासभेचे उपाध्यक्ष श्री मोतीलालजी चौधरी , तिरोडा येथिल समाजिक कार्यकर्ता श्री वाय टि कटरेजी , महिला समाजसेवीका मेघाताई बिसेन , इंडियन आर्मी मनोजजी चौधरी , श्री गोपीचंद पटले मानेवाडा तसेच समस्त पोवार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते व समस्त पोवार समाज संगठनेचे पदाधिकारी तसेच शोकाकुल परिवार व नातेवाईक सुमारे १०० ते ११० च्या संख्येत उपस्थित झाले व स्टार सिटी हास्पिटल चे डाक्टर बळवाईक यांच्या सोबत चर्चा करन पिडीत चौधरी परिवारास तुमच्या लापरवाही चा भुगतान द्या नाही तर समस्त पोवार समाज स्टार सिटी हास्पिटल च्या सामोर आमरण-अनशन करण्यास तैयार आहे असा इशारा दिला , डाक्टर बळवाईक व आमचे समस्त पदाधिकारी यांच्यात चर्चा झाल्या व येणारा गुरुवारला आपण एकत्र बसू व पिडीत चौधरी परिवारास योग्य भुगतान देउ असा आश्वासन डाक्टर बळवाईक यांनी दिला आहे , बैठक चे स्थान व वेळ बुधवारला कळविण्यात येईल याची सर्वानी नोद घ्यावी !!
आपला
श्री हिरदीलाल नेतरामजी ठाकरे नागपुर