पावसाळा सुरू झाला की , बेडकं बोंबलतात तसे..राजकारणी . .बोंबलत सुटले. चोरटे धंदे लपविण्यासाठी मुंजो राने घेतला राजकारणींचा ध्यास.
नागपूर/प्रतिनिधी.
दि १७ आगष्ट २०२४:-
गडचिरोली आदिवासी, मागास, नक्षलग्रस्त, अविकसित जिल्हा म्हणून सर्वत्र माहिती आहे. शासनाने विकास कार्यक्रम सुरू केला असला तरी जिल्ह्यातील फक्त पावसाळ्यात ढग जमा करून विजा च़मकतात तशा राजकीय विजा चमकत असतात. मात्र पाऊस पडत नाही. त्यामुळे राज्यातील हजारो शेतकरी कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाच्या खाईत पडला आहे. तरीही राजकीय पुढारी , नेते आपल्या स्वार्थापोटी विकासकामे पूर्ण झाली असल्याचे फ्ल्याश मारत आहेत. पावसाळा सुरू झाला की बेडकं बोंबलतात तसे अनेक पक्षांचे राजकारणी मात्र निवडणूका आल्या की संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कोणताही विचार न करता बोंबलायला लावतात. मात्र बोंबलत सुटलेल्यांना यातील काही कळत नाही. त्यात बरेचसे खाऊ ,पिऊ डकराऊ इतकेच माहीत असते. राजकारणामुळे दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ झाली आहे. देशात अराजकता वाढली आहे. राजकीय नेत्यांच्या संपत्तीची सखोलपणे चौकशी सुरू झाली पाहिजे.
गडचिरोली जिल्ह्यात मुजोरांसारखे लुटारु आपले चोरटे धंदे लपविण्यासाठी क्षणिक कडकडणाऱ्या ढगांच्या आणि विजांच्या आसऱ्याने चालण्याचा प्रयत्न करीत आहे . मात्र जे सत्य आहे ते गडचिरोली वासियांना लवकरच माहित होणार आहे. चोर…त चोर अन्, वरुन शिवचोर असलेल्या मुजोरांने आणि क्षणिक गडगडणाऱ्या विजांनी आपले आत्मपरीक्षण करायला हवे. हे खुप गरजेचे आहे. सामाजिक न्याय, हक्क आणि अधिकार, कायदा याचं भान हरपून गेलेल्या विजांनी अभ्यासक्रमातील कविता पुर्णपणे पाठ केल्याने देशातील अनेक क्षेत्रातील विविध प्रकारच्या आस्थापनेवरील समस्या कायमची सुटणार नाही.
सध्या स्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत बहुमतांनी निवडुन येणार अशी अपेक्षा करित गडचिरोली पासून ते चिमुर निर्वाचन क्षेत्रातील अनेक ठिकाणी सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक अवशेष नसलेल्या अभ्यासक्रमातील कविता मुखपृष्ठावर ठेवून प्रचंड प्रमाणात प्रचाराचे रणशिंग फुंकले जात आहेत. परंतु त्यातून काय साध्य होणार आहे हे जनता ठरविण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात मुजोरांसारखे कितीही खोटारडे , चोर आणि लुटारु तयार करण्यात आले तरी सत्य पुढे आल्याशिवाय राहणार नाही.