BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

पावसात अडकलेल्यांसाठी ‘एसटी’ आली धावून रेल्वे स्थानकापासून निवासी भागापर्यंत प्रवाशांना मोफत सेवा देण्याचे नियोजन

Summary

मुंबई, दि. 19 : दिवसभर कोसळणाऱ्या  मुसळधार पावसामुळे  रेल्वेची वाहतूक काही ठिकाणी खंडित झाली होती, तर काही ठिकाणी संथपणे सुरू होती. अशावेळी कार्यालयातून अथवा आपल्या कामावरुन घरी निघालेल्या मुंबईच्या चाकरमान्यांना लवकरात लवकर सुरक्षित घरी पोहोचता यावे, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून […]

मुंबई, दि. 19 : दिवसभर कोसळणाऱ्या  मुसळधार पावसामुळे  रेल्वेची वाहतूक काही ठिकाणी खंडित झाली होती, तर काही ठिकाणी संथपणे सुरू होती. अशावेळी कार्यालयातून अथवा आपल्या कामावरुन घरी निघालेल्या मुंबईच्या चाकरमान्यांना लवकरात लवकर सुरक्षित घरी पोहोचता यावे, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री  व एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी एसटीला मुख्य रेल्वे स्थानकाजवळ आपल्या बसेस तैनात करण्यास सांगितले.

तसेच त्या बसेस द्वारे रेल्वेस्थानकात अडकलेल्या प्रवाशांची मोफत सोय करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ‘एसटी’च्या मुंबई आणि ठाणे विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला ठाणे, कल्याण इत्यादी महत्त्वाच्या रेल्वेस्थानकावर आपल्या १०० पेक्षा जास्त बसेस  लावून तेथून  प्रवाशांची त्यांच्या निवासी क्षेत्रापर्यंत मोफत वाहतूक करण्याचे नियोजन केले आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *