नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

पावसाची दांडी : नुकसानीचे पंचनामे करा – अनिल देशमुख आढावा सभेत अधिकाऱ्यांना सुचना

Summary

आढावा सभेत अधिकाऱ्यांना सुचना काटोल, प्रतिनीधी-दुर्गाप्रसाद पांडे गेल्या अनेक दिवसांपासुन पावसाने दांडी मारली आहे. यामुळे पिकांचे नुकसान होत असून अनेक ठिकाणी सोयाबीन व कपाशी रोग आल्याचे सुध्दा समोर येत आहे. शासनाकडुन मदत मिळण्यासाठी नुकसानीचे पंचनामे होणे आवश्यक आहे. यामुळे नुकसानीचे […]

आढावा सभेत अधिकाऱ्यांना सुचना
काटोल, प्रतिनीधी-दुर्गाप्रसाद पांडे
गेल्या अनेक दिवसांपासुन पावसाने दांडी मारली आहे. यामुळे पिकांचे नुकसान होत असून अनेक ठिकाणी सोयाबीन व कपाशी रोग आल्याचे सुध्दा समोर येत आहे. शासनाकडुन मदत मिळण्यासाठी नुकसानीचे पंचनामे होणे आवश्यक आहे. यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याची सुरुवात करावी अशी सुचना माजी गृहमंत्री व आमदार अनिल देशमुख यांनी दिली.
ते काटोल नरखेड तालुक्यातील पिक नुकसानी संदर्भात शनिवारी काटोल येथील उपविभागीय कार्यालयात आयोजीत आढावा बैठकीत बोलत होते. या आढावा बैठकीला जि.प.चे कृषी सभापती बालु जोध, नरखेड बाजार समीतीचे सभापती सुरेश आरघोडे, जि.प. सदस्य सलील देशमुख, पंचायय समीती सभापती संजय डांगोरे, उपसभापती निशीकांत नागमोते, सदस्य चंदा देव्हारे, चंद्रशेखर कोल्हे, अनुप खराडे, गणेश चन्ने यांच्यासह उपविभागीय अधिकारी शिवाजी पडोळे, नरखेड तहसीलदार जाधव, नरखेड खंड विकास अधिकारी निलेश वानखेडे, काटोल खंड विकास अधिकारी घुगल, कुषी, पिक विमा व विज वितरण कंपनीचे अधिकारी उपस्थीत होते.
सोयाबीन वर सध्या मोठया प्रमाणात येलो मोझेक रोगाचाप्रादुर्भाव दिसत आहे. तसेच काही अज्ञात रोग सुध्दा सोयाबीनवर आला आहे. कपाशीवर सुध्दा मर रोग येत आहे. यामुळे कृषी विभागाच्या वतीने या संदर्भात शेतकऱ्यांनी काय उपायोजना करावी असे मागर्दशन करण्याचे सुध्दा अनिल देशमुख यांनी अधिकाऱ्यांना सांगतीले.
ज्या ठिकाणी ओलीताची सोय आहे त्या ठिकाणी शेतकरी पिकांना पाणी देवून वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु विज वितरण कंपनीच्या माध्यमातुन योग्य प्रमाणात विज पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी सुध्दा समोर आल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांना ओलीतासाठी विज पुरवठा कसा सुरळीत देता येईल याकडे सुध्दा विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दयावे असे सुध्दा अनिल देशमुख यांनी यावेळी सांगतीले.
बॉक्स…
पिक विमा कंपन्यांची खैर नाही
मोठया प्रमाणात नुकसान होवूनही जाचक नियमामुळे पिक विम्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होत नाही अश्या अनेक तक्रारी या बैठकीत अनेकांनी उपस्थीत केल्या. यावर आमदार अनिल देशमुख यांनी उपस्थीत पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना याची विचारना केली असता ते योग्य पध्दतीने उत्तर देवू शकले नाही. नुकसान होवूनही पिक विमा कंपनीकडुन शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करण्याऱ्या पिक विमा कंपन्यांची खैर करण्यात येणार नाही असा इशारा अनिल देशमुख यांनी पिक विमा कंपन्यांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *