पावसाची जोरदार बॅटिंग

सिल्लोड( प्रतिनिधी)आज दिनांक ०९ ०६ २०२१ रोजि सायंकाळी पाच वाजता पावसाला सुरुवात झाली केळगाव मुर्डेश्वर जांभई रेलगाव मांडणा पालोद गोलेगाव सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस झाला औरंगाबाद जळगाव महामार्गावर सेवा बंद जुई नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक सेवा कोलमडली आहे सध्या गोलेगाव येथे जुना पूल ढासळल्यामुळे औरंगाबाद जळगाव महामार्ग बंद आहे सध्या शेतीचे काम अंतिम टप्प्यात असून आजच्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे दरम्यान आज संध्या आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते जीवघेण्या गर्मीमुळे लोक त्रस्त होते आज झालेल्या पावसामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे सध्या फार गर्मी असून म्हाताऱ्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागत होता परंतु आज पड लेल्या पावसामुळे त्यांना पण दिलासा मिळाला आहे बी घेण्या साठी लोक मार्केटमध्ये गर्दी करात आहे सध्या करोना चा वाढता प्रार्दुभाव पाहता सरकारने लोकांना बी ही व खते बांधावर दिले पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे