BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

पालक मंत्र्याचे हस्ते पोलीस उपनिरीक्षक धवल देशमुख यांना महासंचालक सन्मानचिन्ह सन्मान चिन्ह देऊन महाराष्ट्र दिनी केला गौरव

Summary

कोंढाळी:- पोलीस विभागात उत्तम कामगिरी, उल्लेखनीय सेवा, विशेष कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या पोलिस महासंचालक पदकांची यादी सोमवारी जाहीर झाली. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी या पदकांची घोषणा केली. राज्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना या पदकाने सन्मानित करण्यात आले. यात कोंढाळी पोलीस स्टेशन […]

कोंढाळी:-
पोलीस विभागात उत्तम कामगिरी, उल्लेखनीय सेवा, विशेष कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या पोलिस महासंचालक पदकांची यादी सोमवारी जाहीर झाली. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी या पदकांची घोषणा केली. राज्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना या पदकाने सन्मानित करण्यात आले. यात कोंढाळी पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस उपनिरीक्षक धवल अशोकराव देशमुख यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्याचे राजस्व मंत्री व नागपूर जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते १ मे रोजी महाराष्ट्र राज्याचे स्थापना दिनी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक पदक, सन्मानचिन्हाने गौरवण्यात आले.
नागपूर जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते मिळालेले पोलीस महासंचालक पदक नागपूर पोलीस आयुक्त, रविंद्र सिंघल यांनी धवल अशोकराव देशमुख‌यांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी नागपूर प्रदेश आयुत,जिल्हाधिकारी नागपूर, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक , नागपूर जिल्हा परिषदेचे सीईओ, सह ‌जिल्ह्याती अनेक ‌विभागांचे विभाग प्रमुखांच्या उपस्थित हा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *