अमरावती महाराष्ट्र हेडलाइन

पालकमंत्र्यांनी घेतला अमरावती महानगरपालिकेतील विविध विषयांचा आढावा

Summary

अमरावती, दि. 24 (जिमाका) : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज महानगरपालिका कार्यालय येथे भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी महानगरपालिकेतील विविध विषयांचा आढावा घेतला. घनकचरा व्यवस्थापन, नियमित पाणीपुरवठा याची योग्य अंमलबजावणी करावी तसेच भुयारी गटार योजनेसंदर्भातील […]

अमरावती, दि. 24 (जिमाका) : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज महानगरपालिका कार्यालय येथे भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी महानगरपालिकेतील विविध विषयांचा आढावा घेतला. घनकचरा व्यवस्थापन, नियमित पाणीपुरवठा याची योग्य अंमलबजावणी करावी तसेच भुयारी गटार योजनेसंदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करावा. याबाबत नियमितपणे आढावा घेण्यात येईल, असे निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले.

या बैठकीत खासदार अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे पाटील, जिल्‍हाधिकारी सौरभ कटियार, महानगरपालिका आयुक्‍त देविदास पवार, उपायुक्‍त जुम्‍मा प्‍यारेवाले, माजी नगरसेवक तसेच नगरसेविका, मनपा अधिकारी यावेळी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापन योग्य रित्याने होण्यासाठी महानगरपालिकेने संबंधित कंत्राटदाराकडून घनकचरा व्यवस्थापन नियमितपणे करुन घ्यावे. यासाठी महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनाबाबत प्रत्यक्ष सर्वेक्षण करावे. ही कामे नियमितपणे होत आहे, याबाबत खातरजमा करावी. अमरावती पाणीपुरवठा योजना अमृत 2.0 अंतर्गत सिंभोरा ते नेरपिंगळाई या मार्गावरील प्रस्तावित पोलादी पाईपलाईनचे कामे तसेच जलशुध्दीकरण केंद्र जलवाहिनीच्या प्रस्ताव तातडीने मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा करावा. तसेच जिल्ह्यातील पाणीपुरवठा नियमित होण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करावी, असेही ते यावेळी म्हणाले.

            पालकमंत्री श्री. पाटील यांनी महानगरपालिकेतील सर्वसाधारण कामकाज, प्रधानमंत्री आवास योजना, पाणी योजना प्रगती पुरवठा, भुयारी गटार, घनकचरा व्‍यवस्‍थापन योजना, स्‍वच्‍छता सेवा नियोजन, मनपा निधी, मनपा कार्यान्वित अन्‍य प्रकल्‍प व उपक्रम, या विषयांवर संबंधितांशी चर्चा करुन माहिती जाणून घेतली. अमरावती शहर स्वच्छ व सुंदर करण्‍याच्‍या सूचना यावेळी त्‍यांनी दिल्‍या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *