कोल्हापुर महाराष्ट्र हेडलाइन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची अकिवाट येथील दुर्घटनास्थळाला भेट मृत सुहास पाटील यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत व सहकार्य करणार

Summary

कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली उलटून सात जण वाहून गेल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली. त्यापैकी एक जणाचा बुडून मृत्यू झाला, दोघेजण अद्यापही बेपत्ता आहेत.  चौघेजण पोहून बाहेर आले. या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन […]

कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली उलटून सात जण वाहून गेल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली. त्यापैकी एक जणाचा बुडून मृत्यू झाला, दोघेजण अद्यापही बेपत्ता आहेत.  चौघेजण पोहून बाहेर आले. या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दुपारी दोनच्या सुमाराला  शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे तातडीने भेट दिली. दत्तवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दुर्घटनेतील मृत सुहास पाटील यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. तसेच दुर्घटनेतून वाचलेल्या इतर जखमींची विचारपूस केली.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी मृत सुहास पाटील यांच्या कुटुंबीयांना तात्काळ चार लाख रुपयांची शासकीय मदत जाहीर केली. मृत सुहास पाटील यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करणार असल्याचेही ते म्हणाले.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी एनडीआरएफच्या जवानांकडून शोध व मदत कार्याची माहिती  घेतली. केंद्रीय एनडीआरएफ पथकासह महाराष्ट्राचे एसडीआरएफ व कर्नाटकच्या एसडीआरएफच्या सात बोटी शोध कार्यात सहभागी झाल्या आहेत.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासमवेत खासदार धैर्यशील माने,  जिल्हाधिकारी अमोल येडगे, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील- यड्रावकर, गुरुदत्त शुगरचे अध्यक्ष माधवराव घाटगे, अशोकराव माने, विजय भोजे आदी तसेच अधिकारी उपस्थित  होते.

***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *