BREAKING NEWS:
उस्मानाबाद महाराष्ट्र हेडलाइन

पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते वैद्यकीय उपकरण व मोबाईल क्लिनिकचे लोकार्पण

Summary

उस्मानाबाद,दि.19(जिमाका): आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांंनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भेट देऊन सी.एस.आर अंतर्गत प्राप्त वैद्यकीय साहित्य,उपरकणे या बरोबर मधु मेह उच्च रक्तदाब,फिट्स,मेनोपॉझ (रजो निवृत्ती) […]

उस्मानाबाद,दि.19(जिमाका): आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांंनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भेट देऊन सी.एस.आर अंतर्गत प्राप्त वैद्यकीय साहित्य,उपरकणे या बरोबर मधु मेह उच्च रक्तदाब,फिट्स,मेनोपॉझ (रजो निवृत्ती) संदर्भातील क्लिनिकचे उदघाटन केले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.उज्वला सरोदे-गवळी आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री यांनी मोबाईल मेडिकल क्लिनिकच्या व्हॅनला हिरवी झेंडी दाखवत त्याचे लोकार्पण केले.तत्पूर्वी डॉ.सावंत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सोयी सुविधांची सखोल पाहणी केली, यावेळी येथील डॉक्टर्स परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या कामकाजाबाबत माहिती विचारली तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि उपस्थित अधिकाऱ्यांना या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *