महाराष्ट्र सांगली हेडलाइन

पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून मिरज तालुक्यातील सावळवाडी, माळवाडी गावातील पूरस्थितीची पाहणी

Summary

सांगली, दि. 27 : जिल्ह्यामध्ये पुराचे पाणी संथ गतीने ओसरु लागले आहे. तरीही नदीकाठच्या गावांमध्ये अजूनही पूरस्थिती कायम आहे. ज्या गावांमध्ये पूरस्थिती आहे अशा गावांना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्रशासन सज्ज असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. पालकमंत्री जयंत पाटील […]

सांगली, दि. 27 : जिल्ह्यामध्ये पुराचे पाणी संथ गतीने ओसरु लागले आहे. तरीही नदीकाठच्या गावांमध्ये अजूनही पूरस्थिती कायम आहे. ज्या गावांमध्ये पूरस्थिती आहे अशा गावांना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्रशासन सज्ज असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज तालुक्यातील सावळवाडी, माळवाडी या भागाचा पूरपरिस्थिती पाहणी दौरा केला. यावेळी जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याबरोबरच पूरग्रस्त भागांमध्ये निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांसह इतरही समस्या निवारणासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरु करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *