अकोला महाराष्ट्र हेडलाइन

पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांचा आढावा

Summary

अकोला,दि.28 (जिमाका)- जिल्ह्यातील विविध विषयाचा आढावा आज राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ […]

अकोला,दि.28 (जिमाका)- जिल्ह्यातील विविध विषयाचा आढावा आज राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी घेतला.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात ना. बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. यावेळी विधानसभा परिषदेचे आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, जिल्हा कृषी अधिक्षक कांतप्पा खोत, सर्व उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसिलदार, महसूल अधिकारी व विविध विभागाचे कार्यालय प्रमुख आदी उपस्थित होते.

 

आढावा बैठकीत ना. बच्चू कडू यांनी निर्देश दिल्या की, जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटूंबाना येणाऱ्या  समस्यांचे तातडीने निराकरण करुन शेतकरी आत्महत्या करु नये, याकरीता उपाययायेजना राबवा. आत्महत्याग्रस्त कुटूंबाना संजय गांधी निराधार योजना, घरकुल योजना, कर्जपुरवठा यासारख्या शासकीय  योजनाचा लाभ प्राधान्याने मिळून द्या. यानंतर कोविडमुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकाना तसेच दुर्धर आजार व शेतकरी आत्महत्यामुळे विधवा झालेल्या महिला व त्यांच्या बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ द्यावा. विधवा व अनाथ बालकांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी अंगणवाडी सेविका व आशावर्कस याच्याव्दारे सर्वेक्षण व शोध घेण्याचे निर्देश यावेळी दिले.

 

व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसीत गावांचा आढावा घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शासनाच्या योजनेनुसार अतिसंरक्षीत क्षेत्रातील गावांना विस्थापित करुन वनक्षेत्राबाहेर पुनर्वसीत करावे. पुनर्वसित गावांना पिण्याचे पाणी, घरकुल, रेशन कार्ड यासारख्या मुलभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन द्यावे. तसेच पुनर्वसीत गावांचे अपुर्ण राहिलेले कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश पालकमंत्री ना. कडू यांनी दिले.

 

जिल्ह्यातील दिव्यांगाकरीता प्राप्त झालेल्या दिव्यांग निधी खर्चाचा महानगरपालिका, नगरपरीषद व सर्व पंचायत समिती निहाय आढावा घेण्यात आला. दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी राखीव निधी तातडीने खर्च करुन दिव्यांगाना अंत्योदय योजनाचा प्राधान्याने लाभ द्या. त्यानंतर नगर परिषद बाळापुर यांनी बांधकाम केलेल्या घरकुलाच्या ठिकाणी मुलभुत समस्या तातडीने मार्गी लावून लाभार्थी घरकुलात राहण्यास इच्छुक नसल्याबाबतचे कारणे शोधून त्यावर उपाययोजना राबवा. बोगस घरकुल घेतलेल्या लाभार्थ्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

 

यावेळी तेल्हारा तालुक्यातील वान धरणातील पाणी पाईपलाईनव्दारे कृषी सिंचनाकरीता देण्याबाबत आढावा घेवून हा भाग सिंचनाखाली आणण्यासाठी आराखडा तयार करुन प्रस्ताव सादर करा. तसेच हिवरखेड मंडळ(वारी भैरवगड) येथील शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन विमा कंपनीव्दारे नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कृषि विभागाने प्रयत्न करावे तसेच या भागातील नागरिकांचे समस्या प्राधण्याने मार्गी लावावे. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या निर्वासित व विस्थापितांना शासनाच्या नियमाप्रमाणे नुकसान भरपाई व पुनर्वसन करावे. तसेच निर्वासित नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करुन त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. सोबतच अकोट तालुक्यातील किनखेड पुर्णा येथील  श्री.संत तुकाराम विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत आश्वस्त केले.

 

पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण

 

पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते अकोट तालुक्यात ग्रामपंचायत भवनाचे उद्घाटन व भूमिपूजन, जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे व विविध कामांचे लोकार्पण करण्यात आले.

 

अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील ग्रामपंचायत भवनाचे तसेच  विविध कामाचे  लोकार्पण  ना. कडू यांच्या उपस्थितीत पार पडले. ग्रामिण भागातील नागरिकांना स्थानिक स्तरावरच उपचार करता यावा यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आधुनिक सोईसुविधा निर्माण करा. आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याचे निर्देश यावेळी दिले.  त्यानंतर ग्रा.पं. बळेगांव ता.अकोट येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळेचे शैक्षणिक गुणवत्ता व आवश्यक सोईसुविधा वाढविण्यासाठी आवश्यक ते निधी देण्याचे आश्वस्त केले. याकामी लोकप्रतिनिधी व लोकसहभागातून शैक्षणीक दर्जा व सुविधा वाढविण्यासाठी सहभाग घेण्याचे आवाहन पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी केले. लोहारा बु. ता. अकोट येथील मिराजी महाराज संस्थान येथील विकासकामांचे लोकार्पण पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *