महाराष्ट्र रायगढ़ हेडलाइन

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ‘समग्र रायगड’ कॉफी टेबल ई-बुकचे उद्घाटन

Summary

अलिबाग, दि.31 (जिमाका):- राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘समग्र रायगड’ या कॉफी टेबल ई-बुक चे अनावरण जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे संपन्न झाले. आजपासून हे कॉफी टेबल बुक नागरिकांकरिता https://raigad.gov.in/samagraraigad/ येथे […]

अलिबाग, दि.31 (जिमाका):- राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘समग्र रायगड’ या कॉफी टेबल ई-बुक चे अनावरण जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे संपन्न झाले. आजपासून हे कॉफी टेबल बुक नागरिकांकरिता https://raigad.gov.in/samagraraigad/ येथे विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
यावेळी आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे व जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
हे कॉफी टेबल बुक तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप व मीडिया आर अँड डी चे श्री.दिलीप कवळी यांचे विशेष सहकार्य लाभले असून कॉफी टेबल बुकचे ई- फ्लिपींग बुक तयार करण्याकरिता राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्राचे वरिष्ठ तांत्रिक संचालक श्री.चिंता मणि मिश्रा, अपर जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी निलेश लांडगे, संगणक अभियंता श्रीकांत नवाळे, प्रतिष भोर व योगेश कराड यांनी विशेष परिश्रम योगदान दिले आहे.
जिल्ह्यातील प्राचीन लेणी, गड किल्ले, समुद्रकिनारे, वॉटर स्पोर्ट्स, धरणे, बंदरे, धबधबे-गिरीस्थाने, अभयारण्य, ऐतिहासिक-धार्मिक स्थळे अशा पर्यटन स्थळांसोबतच उद्योग-कारखाने, स्थानिकांच्या सक्षमीकरणासाठी नाविन्यपूर्ण योजना, पर्यटकांसाठी मार्गदर्शक नकाशे, अशा उपयुक्त माहितीचे संकलन असलेल्या जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “समग्र रायगड – पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण” या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन नुकतेच मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत तसेच राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, रायगड जिल्हाधिकारी तथा प्रभारी कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *