अकोला महाराष्ट्र हेडलाइन

पारदर्शक व गतिमानतेसह नागरिकांना मिळणार घरबसल्या सुविधा – विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे. ई-चावडी प्रणाली शिबीरांचे शुभारंभ ml

Summary

अकोला, दि.8(जिमाका)- ई-चावडी प्रणालीमुळे महसूल विभागाचे कामकाज अधिक पारदर्शक व गतिमान होण्यास मदत होणार असून यामुळे महसूल संबंधित विविध सुविधेचा लाभ नागरिकांना घरबसल्या उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी ई-चावडी प्रणाली शिबीराच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले. तहसिल […]

अकोला, दि.8(जिमाका)- ई-चावडी प्रणालीमुळे महसूल विभागाचे कामकाज अधिक पारदर्शक व गतिमान होण्यास मदत होणार असून यामुळे महसूल संबंधित विविध सुविधेचा लाभ नागरिकांना घरबसल्या उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी ई-चावडी प्रणाली शिबीराच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.

तहसिल कार्यालयात आज ई-चावडी प्रणाली शिबीराचा उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तहसिलदार सुनिल पाटील, मंडळ अधिकारी, तलाठी आदि उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे म्हणाले की, महसूल संबंधित विविध कामकाजाकरीता नागरिकांना कार्यालयाचे पायपीट करावी लागतात. ई-चावडी प्रणालीच्या माध्यमातून सातबारा व त्याबाबत त्रुटी, कृषक-अकृषक कर, अनधिकृत विषयक दंड भरणे अशा विविध सुविधा नागरिकांना घरबसल्या पाहता व ऑनलाइन दंड वा शुल्क भरणा करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ह्या सुविधा  पारदर्शक व गतिमानतेने नागरिकांपर्यंत पोहोचवा, असे सूचना यावेळी त्यांनी दिले.

ई-चावडी प्रकल्पातंर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुकांना 25 गावे ई-चावडी प्रणाली कार्यन्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अकोला तालुक्यात 203 गावाचा समावेश असून संपूर्ण तालुका ई-चावडी प्रणाली कार्यन्वित करण्याचे निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने दि. 8 ते 18 जानेवारी दरम्यान तालुक्यातील 178 गावांचे विशेष शिबीरांव्दारे ई-चावडी प्रणाली कार्यन्वित करण्यात येणार आहे. तसेच 25 गावामध्ये यापुर्वीच ई-चावडी प्रणाली कार्यन्वित करण्यात आली आहे. या शिबीरामध्ये 178 गावांचे महसुली अभिलेख, जुन्या नोंदी, जमिनीचे अभिलेख, सातबारा, सर्वप्रकारचे नकाशांचे आधुनिकीकरण, आठ-अ आणि फेरफार इ. ई-चावडी प्रणालीव्दारे संगणकिकृत करण्यात येणार आहे. याकरीता 12 समन्वयकाची नेमणूक करण्यात आले असून त्यांच्या निरिक्षणात दि. 18 जानेवारीपर्यंत ई-चावडी प्रणाली पुर्ण करुन नागरिकाकरिता उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती तहसिलदार सुनिल पाटील यांनी दिली.  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्वाना लिखाडे यांनी केले

000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *