क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

पवनीमध्ये ‘लेडी डॉन’सह अवैध सावकारांचा हैदोस! ३ लाखांचे मागितले १४ लाख; व्याजाच्या विळख्यात अडकलेल्या कुटुंबांना पोलिसांचा आधार

Summary

धमक्या, शिवीगाळ आणि चेक बाऊन्सचे जाळे; पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या आदेशाने सावकारांच्या मुसक्या आवळल्या! ​पवनी (भंडारा): बँकेपेक्षाही जास्त व्याजाचा हव्यास आणि सर्वसामान्यांच्या अगतिकतेचा फायदा घेणाऱ्या अवैध सावकारांनी पवनी शहरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. १० टक्के व्याजाच्या दराने पैसे देऊन […]

धमक्या, शिवीगाळ आणि चेक बाऊन्सचे जाळे; पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या आदेशाने सावकारांच्या मुसक्या आवळल्या!
​पवनी (भंडारा):
बँकेपेक्षाही जास्त व्याजाचा हव्यास आणि सर्वसामान्यांच्या अगतिकतेचा फायदा घेणाऱ्या अवैध सावकारांनी पवनी शहरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. १० टक्के व्याजाच्या दराने पैसे देऊन कर्जदारांना कंगाल करणाऱ्या आणि धमकावणाऱ्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांत पवनी पोलिसांनी ‘महाराष्ट्र सावकारी अधिनियम’ अंतर्गत गुन्हे दाखल करून मोठी कारवाई केली आहे.

​🚨 केस १: ‘ती’ घरी आली, वस्तू फेकल्या आणि दिली धमकी!
​रामपुरी वॉर्डातील ब्युटी पार्लर चालविणाऱ्या विशाखा दिगांबर नागपुरे यांनी पाच वर्षांपूर्वी संकटाच्या वेळी रेखा संदेश खोब्रागडे या महिला सावकाराकडून ३ लाख ५० हजार रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. विशाखा यांनी व्याजासह तब्बल १३ लाख ८० हजार रुपये परत केले, तरीही रेखा खोब्रागडे हिचे समाधान झाले नाही.
​”पैसे पूर्ण दिले नाहीत” असे म्हणत आरोपी महिलेने विशाखा यांच्या घरी जाऊन धिंगाणा घातला, घरातील वस्तूंची फेकाफेक केली आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून पीडितेने थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. आता पवनी पोलिसांनी कलम ३५२, ३५१(२) भा.न्या.सं. सह सावकारी अधिनियम कलम ४५ (ग) अन्वये गुन्हा (अप क्र. १५४/२०२६) नोंदवला असून पोउपनि. प्रितम येवले पुढील तपास करत आहेत.

​🚨 केस २: व्याजाचा डोंगर आणि चेक बाऊन्सचे ‘ब्लॅकमेलिंग’
​दुसऱ्या एका प्रकरणात, गणेश वॉर्डातील शेलेंद्र दिगांबर कुर्वे यांनी आरोपी संदेश विठोबा खोब्रागडे याच्याकडून ३ लाख ३० हजार रुपये व्याजाने घेतले होते. शेलेंद्र यांनी ३ लाख ४३ हजार रुपये केवळ व्याज म्हणून देऊनही आरोपीची हाव संपली नाही.
​आरोपी संदेशने शेलेंद्र यांनी दिलेला कोरा चेक वापरून त्यावर ३ लाखांची रक्कम टाकली आणि तो बँकेत बाऊन्स केला. “पैसे कधी देतो ते स्टॅम्प पेपरवर लिहून दे, अन्यथा चेक बाऊन्सची केस करतो,” अशी धमकी देऊन तो वारंवार मानसिक त्रास देत होता. या प्रकरणी पवनी पोलिसांनी अप क्र. १५५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला असून पोउपनि. यशोदा पाटील या प्रकरणाचा छडा लावत आहेत.

​सावकांनो सावधान! पोलिसांचा इशारा
​पवनीमध्ये एकाच वेळी उघडकीस आलेल्या या दोन प्रकरणांमुळे अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी अवैध धंदे करणाऱ्यांना मुळापासून उखडण्याचे आदेश दिले असून, पवनी पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

​वृत्त संकलन: अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
📢 वेबमीडिया: www.policeyoddha.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *