पवना धरण १०० टक्के भरले सततच्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा
पत्रकार – सागर घोडके
पुणे (मावळ)
मावळ – मावळ तालुका व पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेची तहान भागवणारे पवना धरण हे १०० टक्के भरले आहे. मागील काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याचा साठा वाढत आहे.
वाढत्या पावसामुळे पवना धरणातून विज निर्मिती संचाव्दारे १३५० क्युसेक विसर्ग सोडण्यात आलेला आहे. तसेच पावसाच्या वाढत्या प्रमाणे दुपारी २ वाजता २१०० क्युसेक विसर्ग वाढवुन ४२०० क्युसेक सांडव्याव्दारे सोडले जाते आहे,
तसेच पाणी सोडण्याचे प्रमाण हे एकुण ५५५० क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे.
तरी पवना नदी तीरावरील सर्व गावातील नागरीकांनी दक्ष राहून नदी तीरावरील सर्व जनावरेजनावरे, मोटारी, अवजारे व इतर सामग्री त्वरीत सुरक्षित ठिकाणी हलवावी जणे करून कुठलेही वित्त व जिवित हानी होणार नाही. तसेच सर्व गावातील नागरीकांनी सर्तक राहावे, तसे केल्यास कोणतेही हानी होणार नाही, पावसाचे प्रमाण जास्त वाटल्यास अधिक प्रवाह वाढु शकतो अशी माहिती पवना धरण पाटबंधारे विभागाचे अभियंता अशोक शेटे यांनी दिली.