हेडलाइन

पवना धरण देशाच्या स्वातंत्र अमृत महोत्सवासाठी सज्ज

Summary

पवना धरण देशाच्या स्वातंत्र अमृत महोत्सवासाठी सज्ज पत्रकार -सागर घोडके पुणे   पुणे (मावळ) – मावळ तालुक्यातील पवना धरण हे मावळ तालुक्यातील व पिंपरी चिंचवडचे तहान भागवते पवना धरणामुळे शेती बहरते. सतत पडत असलेल्या पावसामुळे पवना धरण १०० टक्के भरले […]

पवना धरण देशाच्या स्वातंत्र अमृत महोत्सवासाठी सज्ज

पत्रकार -सागर घोडके

पुणे

 

पुणे (मावळ) – मावळ तालुक्यातील पवना धरण हे मावळ तालुक्यातील व पिंपरी चिंचवडचे तहान भागवते पवना धरणामुळे शेती बहरते. सतत पडत असलेल्या पावसामुळे पवना धरण १०० टक्के भरले आहे. पवना धरणाला ६ दरवाजे आहेत.

१५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे अवचित साधुन मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नांनी पवना धरणाच्या ६ दरवाज्यावर तिरंगी रंगाची रोषणाई केली आहे.

पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणारे व मावळ तालुक्याचे वैभव असलेल्या पवना धरणाच्या सहा दरवाज्यातून पाणी विसर्ग सुरू आहे. यातच भारत देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त या पाणी विसर्गातून तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई करून तिरंगा आमची‌ जान, तिरंगा आमची शान, तिरंगा आमचा अभिमान असे म्हणत येथून तिरंग्याला जणू सलाम करण्यात आला असल्याचे पहावयास मिळत आहे.

 

या तिरंगा पाणी लहरी पाहण्यासाठी व हे मनमोहक दृष्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी पवनानगर वासियांसह परीसरातील नागरीकांनी गर्दी केली आहे. १४ ऑगस्ट व १५ ऑगस्ट रोजी दोन दिवस हे नयनरम्य दृश्य टिपता येणार असल्याची माहिती पवना धरण प्रशासनाने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *