पल्लेझरी ते माथाडी-पिट्टीगुडा नं:-1 निकृष्ट रस्त्यासंदर्भात आप चे जनआंदोलन

जिवती:-तालुक्यातील बऱ्याच गावांना जोडणारा मुख्य राज्य महामार्ग 372 पल्लेझरी ते माथाडी-पिट्टीगुडा नं:-1 या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून चार ते पाच महिन्याच्या आताच रस्त्याची अवस्था भयावह बिकट झाल्याने प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून गाडी चालवावी लागत असल्याने आम आदमी पार्टी जिवती च्या वतीने बांधकाम विभाग जिवती,मुख्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर,तहसीलदार जिवती यांना निवेदन देऊनही या रस्त्याकडे कंत्राटदराने जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने आप जिवती च्या वतीने पल्लझरी(गोंडगुडा) फाट्यावर रस्तारोको लक्षणीय जनआंदोलन करण्यात आले.यावेळी मुख्य कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग चंद्रपूर,यांना पोलीस स्टेशन पिट्टीगुडा नं:-1 यांच्या मार्फत पोलीस उपनिरीक्षक शरद आवारे यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी सदर रस्त्याचे काम एक महिन्याच्या आत करा अन्यथा एक महिन्या नंतर तीव्र आंदोलन करू असा इशारा आपच्या वतीने देण्यात आला.यावेळी आपचे तालुका अध्यक्ष सुनील राठोड,तालुका सचिव गोविंद गोरे,कोषाध्यक्ष गोपाल मोहिते, उपाध्यक्ष नितेश करे,गोविंद मोहिते,तिरुपती गजभिये,मुबारक शेख आदी उपस्थित होते.तसेच यावेळी राका चे माजी जि.प.सदस्य डॉ.पंकज पवार मरकागोंदी येथील माजी सरपंच जालीमशा,माजी उपसरपंच लाला शेख,एकनाथ जाधव, विठ्ठल कासले,रिय्याज सय्यद,दगडू भोसले, दत्ता भोसले,माथाडी येथील व्यंकटी थाडगे,दगडू श्रीरामे,संतोष,सूरज कांबळे,रमेश आडे,गोंडगुडा येथील बापुराव आत्राम,पल्लेझरी येथील बालाजी करले,तसेच मरकागोंदी, माथाडी पिट्टीगुडा,नायवाडा गोंडगुडा या परिसरातील असंख्य नागरिक यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.