महाराष्ट्र हेडलाइन

पर्यावरण संतुलनासाठी आता वृक्षदान चळवळ

Summary

प्रतिनिधी कोंढाळी:- पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. या समस्येकडे वेळीच लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत तर या वसुंधरेवरील सजीव सृष्टीसमोर भविष्यात मोठी संकटे येतील. याचा गांभीर्याने विचार करून कोणी काही तरी करील यापेक्षा आपण यासाठी काय करू शकतो याचा […]

प्रतिनिधी कोंढाळी:- पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. या समस्येकडे वेळीच लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत तर या वसुंधरेवरील सजीव सृष्टीसमोर भविष्यात मोठी संकटे येतील. याचा गांभीर्याने विचार करून कोणी काही तरी करील यापेक्षा आपण यासाठी काय करू शकतो याचा विचार करत कोंढाळी येथील इंद्रप्रभा आयुर्वेदीक औषधालयाचे संचालक अंकित चव्हाण यांनी शुक्रवार १८जुन रोजी कोंढाळी ग्रा प मधे आपल्या सहकार्यांसह पोहचून पिंपळ, वड, पाखड कडू निम, जांभूळ, उबर तसेच अन्य प्रजातीचे रोपटे कोंढाळी चे सरपंच केशवराव धुर्वे, उपसरपंच स्वप्निल व्यास, ज्येष्ठ ग्रा प सदस्य संजय राऊत व ग्रामविकास अधिकारी दिलिप सिंह राठोड तसेच ग्रा प चे उपस्थित कर्मचार्य॔चे समक्ष वृक्षरोपटे जनसहयोगात्मक जन प्रतिनिधींना वृक्ष चळवळ म्हणून
सुपूर्द केले, या प्रसंगी इंद्रप्रभा आयुर्वेदीक औषधालय कोंढाली चे संचालक अंकित चव्हान, हनुमानसिंह राजपुरोहीत, अफसर हुसेन, डाॅ रोहित गायकवाड, करण शाहू, आसीफ शेख, धिरज बालपांडे, याचेच उपस्थित केवळ आपल्या कुटुंबाचा विचार न करता सजीव सृष्टीसाठी व भावी पिढीसाठी सामाजिक योगदान म्हणून पर्यावरण समतोलासाठी प्रयत्नांची स्वत:पासून सुरुवात करण्यात आल्याचे सरपंच केशवराव धुर्वे, ग्रा प सदस्य संजय राऊत यांनी सांगीतले.
अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. तथापि सध्याच्या काळात पर्यावरण समतोल ही मानवाच्या दृष्टिकोनातून, तसेच या पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी, वाढती लोकसंख्या, त्यामुळे वाढलेल्या गरजा, वाढते शहरीकरण, कार्बनडाय ऑक्साइडचे उत्सर्जन, जंगलांचा ऱ्हास, जंगलातील वणवे, वाढते तापमान, कचरा, ई-कचरा, प्लास्टिकचा अतोनात वापर आदीमुळे पर्यावरणास हानी पोहोचत आहे. वाढत्या तापमानामुळे ऋतुमानात बदल झाला आहे. अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले आहे. या साठी पर्यावरण संतुलन गरजेचे आहेच मात्र या वृक्ष संवर्धन ही गरजेचे आहे असे आवाहन उप सरपंच स्वप्निल व्यास यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *