पर्यटन विकास व सांस्कृतिक विभागा कडून काटोल तालुक्याअंतर्गत दोन कोटी चा विकास निधी मंजूर कुलस्वामिनी भवानी माता मंदिर खुर्सापार व/रामगड देवस्थान मासोद साठी एक कोटीचा निधी मंजूर
Summary
कोंढाळी – वार्ताहर काटोल तालुक्यातील कुलस्वामिनी भवानी माता मंदिर संस्थान खुर्सापार, श्री क्षेत्र रामगड देवस्थान मासोद, श्री क्षेत्र हनुमान मंदिर संस्थान सोनपूर (कचरीसावंगा) आणि श्री क्षेत्र महादेव महाराज देवस्थान संस्थान चिखलागढ यांच्या मुलभूत व पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी तालुक्यातील एकूण चार […]

कोंढाळी – वार्ताहर
काटोल तालुक्यातील कुलस्वामिनी भवानी माता मंदिर संस्थान खुर्सापार, श्री क्षेत्र रामगड देवस्थान मासोद, श्री क्षेत्र हनुमान मंदिर संस्थान सोनपूर (कचरीसावंगा) आणि श्री क्षेत्र महादेव महाराज देवस्थान संस्थान चिखलागढ यांच्या मुलभूत व पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी तालुक्यातील एकूण चार देवस्थानांसाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास व सांस्कृतिक कार्य विभागाचे शासनाच्या वतीने काटोल तालुक्यातील चार देवस्थानांच्या विकासासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या TDS-2023/08/P.No.-346 दिनांक 10 ऑगस्ट 2023 च्या आदेशानुसार दोन कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केला असून या करिता पहिला हप्ता म्हणून साठ लाख रुपयांचा विकास निधी जमा केल्याची माहिती खुर्सापार चे सरपंच सुधीर गोतमारे व मासोद चे सरपंच रंजूताई प्रकाश बारंगे यांनी दिली आहे. यात
रामगड देवस्थानपर्यंत पोहोच रस्ता व पूल बांधण्यासाठी आणि कुलस्वामिनी भवानी माता मंदिर संस्थान खुर्सापरच्या सभागृहासाठी हा विकास निधी मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली आहे.