परीक्षा दहावी ची…. अन्यथा तो निर्णय आम्ही रद्द करू; हायकोर्टाचा राज्य सरकारला इशारा.

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 23 मे. 2021
दहावीची परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत राज्य सरकार गंभीर का नाही? असा सवाल उपस्थित करत बुधवारी हायकोर्टाने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
हायकोर्टाने विचारला जाब . परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेेऊन शिक्षणाचा खेळखंडोबा करू नका. दहावीची परीक्षा रद्द करून तुम्ही बारावीची परीक्षा घेताय, हा काय गोंधळ लावला आहे ? तुम्ही तुमचा निर्णय मागे घेता की, आम्ही तो रद्द करायचा ते सांगा.
दरम्यान, कोरोना संसर्गाचा धोका पाहता राज्य सरकारने घेतलेला हा धोरणात्मक निर्णय आहे असे सांगणाऱ्या राज्य सरकारला हायकोर्टाने धारेवर धरले. कोरोनाच्या नावाखाली शिक्षण क्षेत्राची चेष्टा करू नका. असा सल्ला देत राज्य सरकारला यावर पुढील आठवड्यात सुधारीत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.