पदोन्नतीमधील आरक्षणासाठी लक्षवेधी धरणे आंदोलन
महाराष्ट्र शासनाने 7 मे 2021 ला पदोन्नती मधील आरक्षण रद्द केला. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी जनजागृती करण्यासाठी आरक्षण कृती समिती ब्रम्हपुरी यांच्यामार्फत 25 जून 2021 ला बॅरि राजाभाऊ खोब्रागडे चौकात प्रा. डॉ.देवेश कांबळे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.धरणे आंदोलनात डॉ. राजेश कांबळे, जिल्हा परिषद सदस्य, डॉ. प्रेमलाल मेश्राम, प्रा. संजय मगर, जीवन बागडे, हरिदास लाडे, ऍड. नंदा फुले, प्रा. संतोष रामटेके, प्रा.डॉ.विजयकुमार खंडाते,भगवान कन्नाके, सुधाकर कोल्हे, जगदीश भसाखेत्री, हरिदास लाडे, प्रशांत डांगे, विनोद झोडगे यांनी धरणे आंदोलनात आपले विचार मांडले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. देवेश कांबळे यांनी 26 जून 2021 च्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा त हजारोच्या संख्येत सामील होणार असून हा लढा खूप दिवस चालणार आहे. जर शासनाने सात मे चा मागासवर्गीय आरक्षणा विरुद्ध जी आर रद्द केला नाही तर आंबेडकरी समाजाला रस्त्यावर उतरून फार मोठे आंदोलन करावे लागेल. असा इशारा देण्यात आला.यासाठीच आपल्या ला समाजात जाऊन जनजागृती करावी लागेल असे विचार मांडले. विनोद झोडगे भा प क यांनी आपल्या पक्षाचा पाठींबा दिला आहे.आरक्षण हक्क कृती समिती च्या वतीने आयोजित लक्षवेधी धरणे आंदोलनात सहभागी डॉ. राजेश कांबळे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांच्या मार्फतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.कार्यकर्त्यांनी यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन देण्यात आले. धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी पदमाकर रामटेके, नरेश रामटेके, देवानंद तुडकाने, विजय बोदेले, सरजू उईके यांनी परिश्रम घेतले असे आरक्षण हक्क कृती समितीचे निमंत्रक जयदास सांगोडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देताना

धरणे आंदोलनात सहभागी समाजबांधव
