पत्रकारांचे राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा : काटोल उपविभागीय अधिकारी यांना भेटून निवेदन दिले
Summary
काटोल – वार्ताहर पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि पत्रकार हल्ला विरोधी कायदयाची अंमलबजावणी करण्यात होत असलेली कुचराई याच्या निषेधार्ह राज्यातील पत्रकारांच्या अकरा प्रमुख संघटनांशी जोडले गेलेले सर्व पत्रकार गुरूवार १७ऑगस्ट रोजी प्रत्येक शहरात निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायदा मजबूत करण्या साठी.. […]

काटोल – वार्ताहर
पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि पत्रकार हल्ला विरोधी कायदयाची अंमलबजावणी करण्यात होत असलेली कुचराई याच्या निषेधार्ह राज्यातील पत्रकारांच्या अकरा प्रमुख संघटनांशी जोडले गेलेले सर्व पत्रकार गुरूवार १७ऑगस्ट रोजी प्रत्येक शहरात निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायदा मजबूत करण्या साठी.. काटोल येथे दुपारी बारा वाजता
उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात उपस्थित कार्यकारी दंडाधिकारी व नायब तहसीलदार विजयराव डांगोरे यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन यांना निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्हाच्या पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी एका पत्रकारास अर्वाच्च शिविगाळ केल्यानंतर आणि चार गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्यानंतरही या प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावले गेले नाही.. राज्यातही जेथे जेथे पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना घडतात तेथे तेथे पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावण्यास पोलीस टाळाटाळ करत असतात. पत्रकारावरील हल्ले थांबविण्यासाठी वर्ष 2019 मध्ये कायदा अस्तित्वात आल्यानंतर जवळपास दोनशे पेक्षा अधिक पत्रकारांवर हल्ले झाले, त्यांना शिविगाळ केली गेली किंवा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या.. त्यानंतरही केवळ 37 प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायदा लावला गेला.. कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कायद्याचा धाक उरला नाही त्यामुळे पुन्हा एकदा पत्रकारांवरील हल्ल्यांची संख्या चिंता वाटावी एवढी वाढली आहे.. या वर नियंत्रण यावे या करिता राज्यव्यापी आंदोलनाद्वारे गुरूवार १७ऑगस्ट रोजी याचा निषेध करण्यात आला..
पाचोरयाची घटना घडल्यानंतर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, टीव्हीजेए, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, बीयूजे, मुंबई प्रेस क्लब, म्हाडा पत्रकार संघ, क्राईम रिपोर्टर असोशिएशन, पोलिटिकल फोटो जर्नलिस्ट असोशिएशन, महापालिका पत्रकार संघ आदि संघटनांनी एकत्र येत राज्यपालांची भेट घेऊन पत्रकारांवरील वाढत्या हल्लयांबद्दल चिंता व्यक्त केली होती. तसेच पत्रकार संरक्षण कायदयाची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणीही राज्यपालांकडे करण्यात आली होती..तत्पूर्वी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या बैठकीत 17 ऑगस्ट रोजी पत्रकार संरक्षण कायदयाची राज्यभर होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.. त्यानुसार आजचे आंदोलन होत असून काटोल तालुक्यातील अखील भारतीय मराठी पत्रकार परिषद संघटनेचे कार्याध्यक्ष प्रशांत पवार यांचे नेतृत्वात आंदोलनात सहभागी होऊन पाचोरा येथील पत्रकार हल्ल्या चे निषेधार्थ घोषणा देत पत्रकार संरक्षण कायदा आणखी मजबूत करण्यात यावा याबाबत निवेदन देण्यात आले.या प्रसंगी काटोल तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रशांत पवार, अनिल सोनक, ब्रजेश तिवारी, सौरभ ढोरे, प्रशांत पाचपोहर, आशिष मक्कड, किशोर गाढवे ,दुर्गाप्रसाद पांडे सुनिल फाटे,भुषण मुसळे सह अनेक पत्रकारांचे उपस्थितित निवेदन देण्यात आले.