पडोली येथे अवैध दारू साठा जप्त
राज्य शासनाने सन 2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केल्यानंतर दारू तस्कर विविध क्लुप्त्या लढवून बाहेरील राज्यातून व जिल्ह्यातून दारुसाठा चंद्रपूर जिल्ह्यात आणतात दिनांक 23.2.2021ला टाटा पीक अप वाहन क्रमांक एमएच 49एटी 6770 या वाहनातून दारुसाठा चंद्रपूर शहरात घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती पडोली पोलिसांना मिळाली त्याप्रमाणे नागपूर -चंद्रपूर महामार्गावरील पडोली चौकात नाकाबंदी करून सदरील टाटाएस या वाहनांची झडक्ती घेतली असता मिनरल वॉटरच्या खोक्यात मॅकडॉल नंबर 1, रॉयल स्टॅग, स्टॅलिग रिझर्व बी 7, व्हिस्की, किंगफिशर तसेच हायवर्ड कंपनीची बिअर असे एकूण एकोणवीस बॉक्स मध्ये विदेशी दारू साठा आढळून आला त्याची किंमत 2 लाख 43 हजार 600/- व वाहन किंमत 3 लाख असा एकूण 5 लाख 43 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी गणेश शामलाल श्रीवास्तव (48)व सुनिल आलिप्रसाद उईके (44)दोन्ही रा.नागपूर यांच्यावर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.
ही कारवाही पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस विभागीय अधिकारी शिलवंत नांदेडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम.एम. कासार आणि चंदू ताजने, सुरेंद्र खनके, स्वप्नील बुरीले, संदीप वासेकर, सुमित बरडे व अजय दरेकर यानी केली पुढील तपास पडोली पोलीस करीत आहे.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर